Sports

Asia Cup 2025: टीम इंडियातून श्रेयस अय्यरला डच्चू; चाहत्यांची तळपायाची आग मस्तकाला, निवडकर्त्यांना सुनावलं

Fans Angry Over Drop Shreyas Iyer : शुभमन गिल टी-२० संघात परतला, तर आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करूनही श्रेयस अय्यरला पुन्हा एकदा वगळण्यात आले आहे. यावरून चाहत्यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Bharat Jadhav

  • बीसीसीआयने आशिया कप २०२५ साठी भारतीय टी-२० संघाची घोषणा केली.

  • श्रेयस अय्यरला पुन्हा एकदा संघातून वगळण्यात आलं.

  • शुभमन गिल भारतीय संघात परतला आहे.

  • चाहत्यांनी निवडकर्त्यांच्या निर्णयावर सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केली

आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय. निवडकर्त्यांनी पुन्हा एकदा श्रेयस अय्यरला डच्चू दिलाय. तर शुभमन गिल टी-२० संघात परतला आहे. अय्यरला संघातून वगळण्यात आल्यानं चाहत्यांनी निवडकर्त्यांवर संताप व्यक्त केलाय. अय्यरने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली. त्यानंतर आयपीएल २०२५ मध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. तरीही श्रेयसला पुन्हा एकदा संघाच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. श्रेयसचे नाव संघात नसल्यामुळे चाहते सोशल मीडियावर संतापले आहेत.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर धावा करूनही, श्रेयस अय्यरला आशिया कप २०२५ संघात घेण्यात आले नाहीये. अय्यर हा चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. यासोबतच सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतही अय्यरने आपल्या फलंदाजीची कमाल दाखवली होती. त्याने ९ सामन्यांमध्ये १८८ च्या स्ट्राईक रेटने ३४५ धावा केल्या. तर आयपीएल २०२५ मध्ये देखील अय्यरने त्याच्या फलंदाजी आणि कर्णधारपदाच्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. त्याने १७ सामन्यांमध्ये १७५ च्या स्ट्राईक रेटने ६०४ धावा केल्या आहेत.

त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीनंतरही, श्रेयस अय्यरचे नाव आशिया कप २०२५ च्या संघात नाही. अय्यरकडे दुर्लक्ष केल्यानंतर, चाहत्यांचा रोष सोशल मीडियावर उफाळून आलाय. चाहत्यांनी निवडकर्त्यांवर टीका केली आहे. त्याचबरोबर काही चाहत्यांनी अय्यरसाठी भावनिक मेसेज केलेत आहेत.

आशिया कपसाठी भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू राकेसिंग आणि हरिखेत सिंह (यष्टीरक्षक)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोनो रेलमध्ये २०० प्रवासी अडकले; प्रवाशांचा श्वास गुदमरला, भरपावसात रेस्क्यू ऑपरेशन, व्हिडिओ व्हायरल

ITR 2025 : आयटीआर परतावा कमी का मिळतोय? जाणून घ्या खरं कारण

Maharashtra Rain Live News: CSMT वरून लांबपल्याच्या निघणाऱ्या रेल्वे 3 ते 4 तास उशिराने धावणार

Millet Nutrition : वजन कमी करण्यासाठी ज्वारी की नाचणी, कोणती भाकरी आहे जास्त फायदेशीर?

प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर - पुणे वंदे भारतबाबत रेल्वे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT