भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिका २ ऑक्टोबरपासून सुरु
अल्झारी जोसेफ दुखापतीमुळे बाहेर
वेस्ट इंडियन संघाला मोठा धक्का
Asia Cup 2025 मध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान असणार आहे. वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला २ ऑक्टोबर रोजी सुरुवात होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज या दोन संघांमध्ये दोन कसोटी सामने खेळले जातील. ही कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वी वेस्ट इंडियन संघाला मोठा धक्का बसला आहे.
वेस्ट इंडिजच्या कसोटी संघातील वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ दुखापतीमुळे भारत दौऱ्यातून बाहेर पडला आहे. अल्झारी जोसेफला पाठीच्या दुखण्यामुळे अस्वस्थता जाणवली होती. याच दुखापतीमुळे तो कसोटी सामने खेळणार नसल्याचे म्हटले जात आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटने याबाबत अधिकृत माहिती शेअर केली आहे.
अल्झारी जोसेफच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिजने २३ वर्षीय जेडियाह ब्लेड्सला संघात समाविष्ट करण्यात आले आहे. ब्लेडने अद्याप कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. त्याच्याकडे फक्त ७ आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव आहे. ३० सप्टेंबर रोजी संपणाऱ्या नेपाळ विरुद्ध वेस्ट इंडिज टी-२० मालिकेत व्यग्र आहे. त्यानंतर तो कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघात सामील होईल. अल्झारी जोसेफच्या जागी अष्टपैलू जेसन होल्डरला सुरुवातीला संपर्क साधण्यात आला होता. तथापि, वैद्यकीय तपासणी सुरू असल्याने होल्डरने नकार दिला.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना २ ऑक्टोबरपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना १० ऑक्टोबरपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल.
भारताचा संघ
शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन जगदीसन, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव
वेस्ट इंडिजन सुधारित संघ
रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वॉरिकन, केवलन अँडरसन, अॅलिक अथानासे, जॉन कॅम्पबेल, टेगेनारिन चंद्रपॉल, जस्टिन ग्रीव्हज, शाई होप, टेविन इमलाच, जेडियाह ब्लेड्स, शमार जोसेफ, ब्रँडन किंग, अँडरसन फिलिप, खॅरी पियरे, जेडेन सील्स
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.