Suryakumar Yadav Wicket Asia Cup 2025 x
Sports

Suryakumar Yadav आउट की नॉट आउट? चेंडूचा जमिनीला स्पर्श झाला होता का? Video

IND Vs Pak Asia Cup 2025 Final : १४६ धावांवर पाकिस्तानचा संघ ऑलआउट झाला. भारतासमोर जिंकण्यासाठी १४७ धावांचे लक्ष गाठावे लागणार आहे. डावाच्या सुरुवातीला भारताचे ३ फलंदाज बाद झाले आहेत.

Yash Shirke

Asia Cup 2025 चा अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर १४७ धावांचे आव्हान ठेवले आहे. दुसऱ्या डावामध्ये भारतीय संघाला लागोपाठ २ धक्के बसले आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये अभिषेक शर्मा बाद झाला, त्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादवदेखील तंबूत परतला. सूर्यानंतर शुबमन गिल सुद्धा बाद झाला. विशेष म्हणजे तिघेही झेलबाद झाले.अवघ्या काही धावांच्या अंतराने भारताचे प्रमुख तीन फलंदाज माघारी गेले.

भारत विरुद्ध पाकिस्तान अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार फक्त १ धाव करुन बाद झाला. शाहीन शाह आफ्रिदीच्या ओव्हरमध्ये सलमान अली आगाने त्याचा झेल घेतला. सलमानने झेल घेताना चेंडूचा जमिनीवर स्पर्श झाला असे वाटले. त्यानंतर हे प्रकरण थर्ड अंपायरकडे गेले. थर्ड अंपायरने झेल योग्य असल्याचे सांगितले आणि सूर्या बाद झाला. या विकेटबाबत सोशल मीडियावर चर्चा होत आहे. त्यावेळेस चेंडूचा जमिनीला स्पर्श झाल्याचेही अनेकजण म्हणत आहेत.

सूर्यकुमार यादवच्या आधी अभिषेक शर्मा बाद झाला. त्याने फक्त ५ धावा केल्या. फहीम अशरफ दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आला होता. ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर अभिषेकने शॉट मारला, त्याचा झेल हारिस रौफने घेतला. सूर्या बाद झाल्यानंतर आलेला दबाव कमी करण्यासाठी शुबमन गिलने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात तोसुद्धा बाद झाला. गिलने फक्त १२ धावा केल्या.

पहिल्या डावात १९ व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूत पाकिस्तानचा संघ ऑलआउट झाला. साहिबजादा फरहानने ५७ धावा केल्या. फखर जमान ४६ धावांवर बाद झाला. याव्यतिरिक्त सैम अयुबने १४ धावा केल्या. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूने चांगली फलंदाजी केली नाही. बरेचसे खेळाडू शून्यावर बाद झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope: नोकरी व्यवसायात काम करण्याऱ्यांवर लक्ष्मीची कृपा राहणार, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Mumbai News : मुंबई महापालिकेत सर्वात मोठा बदली घोटाळा; नव्या वादाचा चेंडू थेट CM फडणवीसांच्या कोर्टात

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये खाजगी बस आणि एसटी बसचा अपघात

येमेनजवळील समुद्रात मोठी दुर्घटना; जहाजावरील LPG टँकरला भीषण आग, जहाजावर होते २३ भारतीय खलाशी

Eyebrow Care: आयब्रो डार्क दिसत नाहीत? मग नॅचरल टिप्स फॉलो करा काहीच दिवसात जाणवेल फरक

SCROLL FOR NEXT