India vs Pakistan cricket match  Saam tv
Sports

India vs Pakistan : पाकिस्तानने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं; भारताचे ३ तगडे फलंदाज तंबूत परतले

India vs Pakistan cricket match : पाकिस्तानने भारताचे तीन गडी बाद केले आहेत. तीन गडी बाद झाल्याने भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.

Vishal Gangurde

आशिया कप २०२५ फायनलमध्ये भारताने १४७ धावांचा पाठलाग करताना सुरुवातीलाच तीन गडी बाद

पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्या ३ षटकांतच भारतावर दडपण

ही खराब सुरुवात पाहून भारतीय चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण

सामना सध्या अत्यंत तणावपूर्ण

आशिया कप २०२५ स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तानदरम्यान हायव्होल्टेज सामना सुरु आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला १४७ धावांचं आव्हान दिलं आहे. पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा सामना करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाचे पहिले ३ गडी बाद झाले आहेत. टीम इंडियाचे ३ स्टार खेळाडू तंबूत परतल्याने चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.

पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा सामना करताना टीम इंडियाची खराब सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचे २० धावांच्या आतच तीन विकेट गेले. चांगल्या फॉर्म खेळणाऱ्या अभिषेक शर्माची जादू फारशी चालली नाही. अभिषेक शर्मा ५ धावांवर बाद झाला. सुर्यकुमार अवघ्या १ चेंडूवर बाद झाला. तर शुभमन गिल देखील १२ धावांवर बाद झाला.

तिन्ही स्टार खेळाडू बाद झाल्याने टीम इंडियावर दडपण वाढलं आहे. तिन्ही तगडे फलंदाज बाद झाल्यानंतर आता संपूर्ण तिलक शर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे आणि रिंकू सिंह यांच्यावर असणार आहे. संघाला जिंकवण्यासाठी उर्वरित फलंदाजांवरही मोठं दडपण असणार आहे. भारताचे तिन्ही खेळाडू बाद झाल्याने चाहत्यांची चिंता वाढली आहे.

दुसरीकडे टीम इंडियासाठी कुलदीप यादवने चांगली गोलंदाजी केली. कुलदीपने ४ षटकात ३० धावा देऊन ४ गडी बाद केले. त्याने एकाच षटकात तीन गडी बाद केले. कुलदीपच्या भेदक मारा करून गडी बाद करत पाकिस्तानचं खच्चीकरण केलं. अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराहनेही चांगली गोलंदाजी केली.

Navi Mumbai Airport: नवी मुंबई एअरपोर्ट प्रवाशांसाठी सुरु! पहिलं विमान दाखल | VIDEO

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Shocking : वंशाला दिवाच हवा म्हणून गर्भपात केला, पण महिलेचा जीव गेला, सोलापूरमधील धक्कादायक घटना

Gold Price Today : आजपण सोनं महागलं, ख्रिसमसला प्रति तोळा इतका दर वाढला, पाहा ताजे रेट्स

BOI Recruitment: खुशखबर! फ्रेशर्ससाठी बँकेत नोकरी; ४०० पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

SCROLL FOR NEXT