तिलक वर्माचा रघु यांच्या पाया पडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
आशिया कप २०२५ मध्ये तिलक वर्माने स्टार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.
पाक कर्णधार सलमान आगा यांच्या वादग्रस्त कृतीवरुन भारत-पाक फरक स्पष्ट झाला.
Tilak Varma हा आशिया कप २०२५ मधील अंतिम सामन्यात भारतासाठी स्टार खेळाडू ठरला. त्याने ५३ चेंडूत ६९ धावांची खेळी केली. फलंदाजी करताना त्याने ४ षटकार आणि ३ चौकार मारले. संजू सॅमसन, शिवम दुबे आणि रिंकू सिंह यांच्या साथीने तिलक वर्माने भारताला सामना जिंकवून दिला. सामन्यानंतर तिलक वर्माचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओ सर्वात जास्त चर्चा होत आहे.
अंतिम सामन्यापूर्वी सुपर ४ मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ दुसऱ्यांदा आमनेसामने आले होते. त्या सामन्यात ७ विकेट्सने भारताने पाकिस्तानवर मात केली. या सामन्यात तिलक वर्मा इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द मॅच ठरला होता. टीम इंडियाचा थ्रो डाउन स्पेशलिस्ट रघु (डी. राघवेंद्र) यांच्या हस्ते तिलक वर्माचा सत्कार करण्यात आला. तेव्हाचा ड्रेसिंग रूममधला तिलक वर्माचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रघु हे टीम इंडियामध्ये थ्रो डाउन स्पेशालिस्ट म्हणून काम पाहतात. याशिवाय संघाच्या अन्य महत्त्वपूर्ण कामांची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये रघु हे तिलक वर्माच्या गळ्यात इम्पॅक्ट प्लेयरसाठीचे मेडल घालत असतात. तिलक वर्मा सर्वात आधी रघु यांच्या पाया पडतो, त्यांना मिठी मारतो. त्यानंतर रघु हे तिलकचा सत्कार करतात.
एका बाजूला तिलक वर्माचा हा व्हिडीओ व्हायरल होत असताना दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगाच्या व्हिडीओची चर्चा होत आहे. आशिया कपचा अंतिम सामना संपल्यानंतर उपविजेता संघ म्हणून सत्कार करण्यासाठी कर्णधार सलमान आगाला बोलवण्यात आले. धनादेशाचा चेक दिल्यानंतर सलमानने तो दूर फेकून दिला. त्यावेळेस तेथे अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. त्याने अशी कृती करत सर्वांचा अपमान केला. एका बाजूला वरिष्ठांच्या पाया पडणारा तिलक आणि दुसऱ्या बाजूला दिग्गजांचा अपमान करणारा सलमान! दोघांच्या कृतीवरुन भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये किती फरक आहे हे स्पष्ट होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.