Asia Cup IND Vs Pak Final x
Sports

IND Vs Pak Final पूर्वी भारताच्या स्टार खेळाडूला धक्का, ICC कडे तक्रार दाखल; मोठी कारवाई होणार?

Asia Cup IND Vs Pak Final : आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्याविरोधात पीसीबीने आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे.

Yash Shirke

  • आशिया कप फायनलपूर्वी अर्शदीप सिंहविरुद्ध पीसीबीने आयसीसीकडे तक्रार दाखल केली.

  • पाकिस्तानने अर्शदीपवर अश्लील हावभाव केल्याचा आरोप केला आहे.

  • या तक्रारीवर आयसीसीचा निर्णय काय असेल याकडे लक्ष लागले आहे.

Asia Cup 2025 Final पूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पीसीबीने अर्शदीपबाबत आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर अश्लील हावभाव केल्याचा आरोप केला आहे. या आरोपांमागील सत्य आयसीसीच्या निर्णयानंतरच कळेल. अर्शदीप सिंहपूर्वी पीसीबीने भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या विरोधातही तक्रार दाखल केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्शदीप सिंहविरुद्ध ज्या घटनेवरुन तक्रार दाखल करण्यात आली आहे, ती घटना २१ सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सुपर ४ सामन्यादरम्यान घडली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार, अर्शदीप सिंहने त्या सामन्यादरम्यान प्रेक्षकांकडे पाहत अश्लील हावभाव केले होते. त्याने अशी वर्तवणूक करत आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, असे पीसीबीचे मत आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केलेल्या तक्रारीनुसार, भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहचे वर्तन बेजबाबदार आणि खेळात अडथळा आणणारे होते. त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीसीबीने आयसीसीकडे केली आहे. आता या तक्रारीवर आयसीसी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अर्शदीप सिंहच्या आधी पीसीबीने भारतीय टी-२० क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या विरोधात देखील तक्रार दाखल केली होती. सूर्यकुमार यादवने क्रिकेटचा वापर करुन राजकारण केल्याचा आणि आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने केला होता. या प्रकरणी आयसीसीने सूर्यावर कारवाई केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

SCROLL FOR NEXT