ACC Finalizes Asia Cup 2025 Venue and Schedule Amid BCCI's Online Presence Reports saam tv
Sports

Asia Cup 2025 : आशिया कपच्या आयोजनावर शिक्कामोर्तब! या देशात होणार स्पर्धा, भारत-पाकिस्तान भिडणार का?

Asia Cup 2025 venue : आशिया चषक २०२५ स्पर्धेच्या आयोजनाबाबत अखेर निर्णय घेण्यात आल्याचे मीडिया रिपोर्ट्स आहेत. या स्पर्धेला ८ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. अंतिम लढत ही २८ सप्टेंबरला होणार आहे. या स्पर्धेचे ठिकाण आणि संघांबाबतही निर्णय झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Nandkumar Joshi

  • ACC च्या बैठकीत आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनावर शिक्कामोर्तब

  • आशिया चषक स्पर्धा ८ सप्टेंबरपासून सुरू होणार

  • भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ येणार आमनेसामने?

गेल्या काही महिन्यांपासून आशिया चषक २०२५ स्पर्धेबाबत जोरदार चर्चा सुरू होत्या. अखेर ही स्पर्धा होणार आहे. त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मीडिया रिपोर्ट्स आहेत. ढाका येथे एशियन क्रिकेट कौन्सिलच्या बैठकीत आशिया चषक २०२५ च्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात येणार होती. त्या बैठकीसाठी जाण्यास बीसीसीआयनं नकार दिला होता. मात्र, नंतर बीसीसीआयच्या प्रतिनिधींनी या बैठकीत 'ऑनलाइन' सहभाग घेतला. या बैठकीत आशिया चषक स्पर्धेवर चर्चा झाली. तसेच स्पर्धेच्या आयोजनावर सहमती झाल्याचे सांगण्यात येत आहे. ८ सप्टेंबरपासून ही स्पर्धा यूएईमध्ये सुरू होणार असल्याचेही वृत्त आहे.

कधीपासून सुरू होणार स्पर्धा?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिया चषक स्पर्धा ८ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील अंतिम लढत ही याच महिन्याच्या अंतिम आठवड्यात होईल. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होतील. त्यात भारत, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान हे संघ असतीलच, शिवाय एसीसी प्रीमिअर कप विजेता संघ हाँगकाँग, ओमान आणि यूएई हे संघ देखील भाग घेतील. मिळालेल्या माहितीनुसार, आशिया चषक स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जाणार आहे. भारताकडे या स्पर्धेचं यजमानपद असेल. लवकरच या स्पर्धेचं वेळापत्रक प्रसिद्ध होणार आहे.

टी २० वर्ल्डकप २०२६ होणार आहे. ते लक्षात घेऊन यावेळी ही स्पर्धा टी २० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. मागील वेळी वनडे वर्ल्डकप स्पर्धा असल्यानं या स्पर्धेचं आयोजन हे वनडे फॉरमॅटमध्ये झालं होतं. हायब्रिड मॉडलनुसार, पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये सामने झाले होते. भारतीय संघानं फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत विजेतेपद पटकावलं होतं.

आशिया कप विजेता कोण?

मागील आशिया चषक स्पर्धा २०२३ मध्ये झाली होती. या स्पर्धेचा अंतिम सामना कोलंबोत झाला होता. त्यात भारत विजयी झाला होता. श्रीलंकेचा संघ अवघ्या ५० धावांवर गारद झाला होता. भारताकडून मोहम्मद सिराजनं भेदक गोलंदाजी करत ७ षटकांत २१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या होत्या. हार्दिक पंड्याने तीन विकेट घेतल्या होत्या. टीम इंडियाने ५१ धावांचं लक्ष्य अवघ्या ६.१ षटकांत गाठलं होतं. या पर्वातही भारतीय संघाकडून क्रिकेट चाहत्यांच्या प्रचंड आशा आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

SCROLL FOR NEXT