asia cup 2023 saam tv
क्रीडा

Asia Cup 2023, Super 4 Schedule: आशिया कपमध्ये आजपासून सुपर-४ चा थरार, पाहा टीम इंडियाचा सामना कधी?

Ankush Dhavre

Team India Super 4 Schedule:

अफगाणिस्थान विरूद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्यानंतर आता आशिया चषक २०२३ स्पर्धेतील सुपर ४ फेरीचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. ग्रुप ए मधून भारत आणि पाकिस्तान संघ तर ग्रुप बी मधून श्रीलंका आणि बांगलादेश या ४ संघांनी सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे.

आजपासून (६ सप्टेंबर) सुपर ४ फेरीतील सामन्यांना प्रारंभ होणार आहे. भारतीय संघाचा सुपर ४ फेरीतील पहिला सामना १० सप्टेंबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध रंगणार आहे.

साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केल्याने हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

तर भारताचा दुसरा सामना नेपाळविरूद्ध रंगला. या सामन्यातही पावसाने व्यत्यय आणला होता. मात्र डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने हा सामना १० विकेट्सने जिंकला. आता भारतीय संघाचा सुपर -४ फेरीतील पहिला सामना १० सप्टेंबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध रंगणार आहे. तर १२ सप्टेंबर रोजी भारताचा संघ श्रीलंकेविरुद्ध दोन हात करण्यासाठी मैदानात उतरेल.

तर इतर संघांच्या वेळापत्रकाबद्दल बोलायचं झालं तर, आज पाकिस्तान आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. त्यानंतर १० सप्टेंबर रोजी पाकिस्तानचा सामना भारतीय संघासोबत आणि १४ सप्टेंबर रोजी श्रीलंकेसोबत असणार आहे. (Latest sports updates)

तसेच बांगलादेश संघाच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर ९ सप्टेंबरला श्रीलंका आणि १५ सप्टेंबर रोजी भारतीय संघाविरुद्ध बांगलादेशचा सामना खेळवला जाईल.

आशिया चषक स्पर्धेतील सामने कोलंबो आणि लाहोरमध्ये खेळवण्यात येणार आहेत. कँडीप्रमाणे कोलंबोमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये देखील पाऊस अडथळा बनू शकतो. त्यामुळे सामने रद्द होऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

SCROLL FOR NEXT