shreyas iyer saam tv
क्रीडा

Asia Cup 2023: टीम इंडियासाठी गुड न्यूज!पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यापूर्वी श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट; केएल राहुल खेळणार का?

Ankush Dhavre

India vs Pakistan Match Shreyas Iyer- KL Rahul Fitness Update:

आशिया चषक २०२३ स्पर्धेसाठी भारताचा संघ सज्ज झाला आहे. भारतीय संघाचा पहिला सामना येत्या २ सप्टेंबर रोजी पाकिस्तान संघाविरूद्ध रंगणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट चाहत्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

या सामन्यापूर्वी श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट झाला आहे. तर केएल राहुलच्या फिटनेसबाबत देखील मोठी अपडेट समोर आली आहे.

इनसाईडच्या वृ्त्तानूसार बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने असे म्हटले आहे की, 'श्रेयस अय्यर फिट आहे. त्याने फिटनेस टेस्ट यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. केएल राहुलबद्दल बोलायचं झालं तर सामन्याच्या दिवसापर्यंत निर्णय घेतला जाईल. त्याने सराव सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मात्र तो अजुनही पूर्णपणे फिट नाही. तो अजूनही १०० टक्के फिट नाही. या सामन्यापूर्वी आमच्याकडे वेळ शिल्लक आहे. आम्हाला अशी आशा आहे की,तो लवकरात लवकर फिट होईल. जर तो फिट झाला नाही तर आमच्याकडे ईशान किशनचा पर्याय उपलब्ध आहे.' (Latest sprots updates)

भारताचा संघ पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याने आपली मोहिम सुरू करणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचे ६ दिवसीय सराव शिबिर पार पडले. हे सराव शिबिर केएल राहुल आणि श्रेयस अय्यरसाठी अतिशय महत्वाचे होते.

कारण पूर्णपणे फिट नसतानाही दोघांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेतील पहिला सामना येत्या ३० सप्टेंबर रोजी रंगणार आहे.

स्पर्धेतील पहिला सामना येत्या ३० ऑगस्ट रोजी पाकिस्तान विरूद्ध नेपाळ या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

आशिया चषकासाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पांड्या, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर. , सूर्यकुमार यादव , तिलक वर्मा , प्रसिद्ध कृष्णा , संजू सॅमसन (राखीव).

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT