आशिया चषक स्पर्धेची धुकधडाक्यात सुरुवात झाली आहे. स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ या दोन्ही संघांमध्ये पार पडला. आयसीसी रँकिंगमध्ये आपण नंबर १ वर का आहोत हे पाकिस्तानने या सामन्यात दाखवून दिले आहे.
स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात विजय सलामी देत पाकिस्तानने २३८ धावांनी विजय मिळवला आहे.
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाकडून २ फलंदाजांनी शतकी खेळी केली. या डावाच्या सुरुवातीलाच नेपाळने पाकिस्तानला २ मोठे धक्के दिले होते.
त्यानंतर पाकिस्तानने जोरदार कमबॅक केले. पाकिस्तानकडून बाबर आजमने १३१ चेंडूंचा सामना करत सर्वाधिक १५१ धावांची खेळी केली.
तर इफ्तिकार अहमदने ७१ चेंडूंचा सामना करत नाबाद १०९ धावांची खेळी केली. तर मोहम्मद रिजवानने ४४ धावांची खेळी केली. पाकिस्तानने ५० षटकअखेर ६ गडी बाद ३४२ धावा केल्या. (Latest sports updates)
पाकिस्तानचा २३८ धावांनी विजय..
पाकिस्तान आणि नेपाळ हे दोन्ही संघ पहिल्यांदाच वनडे सामना खेळण्यासाठी आमने सामने आले होते. पाकिस्तानने नेपाळला विजय मिळवण्यासाठी ३४३ धावांचे भलेमोठे आव्हान दिले होते. नेपाळकडून सोंपल कामीने सर्वाधिक २८ धावा केल्या.
तर आरिफ शेखने २६ धावा केल्या. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना शादाब खानने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर हॅरिस राउफ आणि शाहीन आफ्रिदीने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. नेपाळचा संपूर्ण डाव २३.४ षटकात १०४ धावांवर संपुष्टात आला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.