Asia Cup 2023 big blow for Pakistan before match against team India naseem shah injured during fielding Saam TV
Sports

IND vs PAK, Asia Cup 2023: भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानला मोठा धक्का; मॅचविनर गोलंदाज आशिया कपमधून बाहेर?

IND vs PAK, Asia Cup 2023 Match: भारताविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानसाठी वाईट बातमी आली आहे. पाकिस्तानचा मॅचविनर गोलंदाज बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे.

Satish Daud

IND vs PAK, Asia Cup 2023 Match: आशिया चषक २०२३ स्पर्धा सध्या जोमात सुरू असून स्पर्धेचा पहिला टप्पा म्हणजेच साखळी सामने संपले आहेत. बुधवारपासून (६ सप्टेंबर) सुपर-४ मधील सामन्यांना सुरुवात झाली आहे. पहिला सामना पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात झाला. (Latest Marathi News)

या सामन्यात पाकिस्तानने बांग्लादेशवर ७ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. मोहम्मद रिझवान, इमाम उल हक आणि हरीस रऊफ पाकिस्तानच्या विजयाचे हिरो ठरले. इमामने ७८ तर रिझवानने नाबाद ६३ धावांची अर्धशतकी खेळी केली.

गोलंदाजीत हरीस रऊफ याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर नसीम शाहने ३ विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. या विजयामुळे पाकिस्तानने फायनलसाठी आपला दावा भक्कम केला आहे. आता त्यांचा सामना टीम इंडियाविरुद्ध १० सप्टेंबर रोजी होणार आहे.

मात्र, या सामन्याआधी पाकिस्तानसाठी वाईट बातमी आली आहे. पाकिस्तानचा मॅचविनर गोलंदाज बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो टीम इंडियाच्याविरुद्धच्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो.

बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात वेगवान गोलंदाज नसीम शाहला फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली. त्यामुळे नसीम शाह याला मैदानाबाहेर जावं लागलं. नसीमने फाईन लेगवर बाऊंड्री रोखण्यासाठी जीवाची बाजी लावून डाईव्ह मारली.

मात्र, चौकार रोखण्याच्या नादात त्याच्या खांद्याला दुखापत झाली. नसीम शाह याची स्थिती किती गंभीर आहे, याबाबतची अधिकृत माहिती मिळाली नाही. मात्र, नसीमला दुखापतीमुळे भारत विरुद्ध खेळता आलं नाही, तर तो पाकिस्तानसाठी मोठा झटका असेल.

टीम इंडियाची संभावित प्लेईंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार) शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

पाकिस्तान प्लेईंग इलेव्हन: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रिदी आणइि हरीस रौफ.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

SCROLL FOR NEXT