PAK vs BAN Asia Cup: इमाम उल-हक आणि मोहम्मद रिझवानची तुफानी खेळी; पाकिस्तानने बांगलादेश विरुद्ध सुपर-४ चा पहिला सामना जिंकला

PAK vs BAN Asia Cup: इमाम उल-हक आणि मोहम्मद रिझवानने जोरदार फटकेबाजी करत बांगलादेश संघावर मात केली.
PAK vs BAN Asia Cup
PAK vs BAN Asia CupTwitter

Pakistan VS Bangladesh, Asia Cup 2023 News:

आज आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघाचा सामना झाला. सुपर-४ च्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला १९४ धावांचं आव्हान दिलं होतं. या आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या इमाम उल-हक आणि मोहम्मद रिझवानने जोरदार फटकेबाजी करत बांगलादेश संघावर मात केली. (Latest Marathi News)

बांगलादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या फलंदाजांनी सयंमाने सुरुवात केली. पहिल्या षटकात त्यांनी ८ धावा कुटल्या. पाकिस्तानला दहाव्या षटका पहिला धक्का बसला. फखर जमानला शोरिफुलने पायचित केलं. जमानने ३१ चेंडूत ३ चौकार मारत २० धावा कुटल्या.

PAK vs BAN Asia Cup
Bhuvneshwar Kumar News: संघात निवड न होताच तळपली भुवीची बॅट! षटकारांचा पाऊस पाडल्याचा VIDEO होतोय व्हायरल

पाकिस्तानला १६ व्या षटकात पाकिस्तानला मोठा धक्का बसला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला तस्कीन अहमदने बाद केले. बाबर हा १६ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. त्याने २२ चेंडूत १७ धावा कुटल्या.

इमाम-उल-हकने दमदार खेळी दाखवत ६० चेंडूत ५५ धावा करत अर्धशतक पूर्ण केलं. इमाम-उल-हकने एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील १९ वं अर्धशतक ठोकलं. त्यावेळी मोहम्मद रिझवान आणि इमाम-उल-हकने २० चेंडूत ४० भागिदारी रचली होती.

PAK vs BAN Asia Cup
Sachithra Senanayake News: वर्ल्डकपआधी प्रसिद्ध क्रिकेटपटूला अटक; काय आहे प्रकरण?

३३ व्या षटकात मिराजने इमामचा त्रिफळा उडवला. इमामच्या रुपाने पाकिस्तान तिसरा धक्का बसला. इमाम आणि मोहम्मद रिझवानने ८५ धावांची भागिदारी रचली होती. रिझवान ६३ धावांवर नाबाद राहिला होता. पाकिस्तानने ३९.३ षटकात ३ बाद १९४ करत मोठा विजय मिळवला.

रउफची जबरदस्त गोलंदाजी

टीम बांगलादेशने पाकिस्तानला १९४ धावांचं आव्हान दिलं होतं. बांगलादेश संघाने ३८.४ षटकात १९३ धावा कुटल्या होत्या. पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रउफने बांगलादेश संघाला चांगलंच जेरीस आणलं. रउफने ६ षटकात १९ धावा देऊन ४ विकेट घेतले. बांगलादेशकडून मुश्फिकुर रहीमने ८७ चेंडूत ६४ धावा कुटत सर्वाधिक धावा केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com