क्रिकेटविश्वातून मोठी बातमी हाती आली आहे . श्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूला मॅच फिक्सिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. सचित्रा सेनानायके असं क्रिकेटपटूचं नाव आहे. सचित्राला बुधवारी मॅच फिक्सिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
सचित्रा सेनानायके करियरच्या सुरुवातीलाच त्याच्या गोलंदाजीच्या अॅक्शनमुळे चर्चेत आला होता. क्रीडा भ्रष्टाचार तपास युनिटने श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायकेला अटक केली.
तीन आठवड्याआधीच त्याच्या परदेश दौऱ्यावर बंदी घालण्यात आली होती. त्याच्यावर २०२० साली श्रीलंकेवर प्रीमियर लीगमधील सामने फिक्सिंग केल्याचा आरोप आहे. दोन क्रिकेटपटूंना मॅच फिक्सिंगसाठी प्रेरीत केल्याचाही आरोप आहे. कोलंबोच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाद्वारे सचित्राला परदेश दौऱ्यावर बंदी घालण्यात आली.
क्रिकेट कारकिर्द कशी होती?
३८ वर्षांच्या सचित्रा सेनानायक याने २०१२ ते २०१६ च्या क्रिकेट कारकिर्दीत श्रीलंकेसाठी एक कसोटी सामना, ४९ एकदिवसीय सामने आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यात एकही विकेट घेतला नाही.
एकदिवसीय सामन्यात ५३ विकेट आणि टी-२० सामन्यात २५ विकेट घेतले. २०१४ मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यादरम्यान सचित्राच्या बॉलिंग अॅक्शनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. (Cricket Latest News)
दरम्यान, सचित्रा हा २०१४ साली टी-२० विश्वचषक अंतिम सामन्यात संघाचा एक भाग होता. सचित्राने टी-२० विश्वचषकात ६ सामन्यात एकूण ४ गडी बाद केले होते.
सचित्रा सेनानायकेच्या बॉलिंग अॅक्शनमुळे त्याच्यावर काही महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली होती. सेनानायकने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा देखील भाग होता. त्याने आयपीएच्या ८ सामन्यात ९ विकेट घेतल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.