Asia Cup 2022 Saam Tv
क्रीडा

Asia Cup 2022|आशिया चषक चॅम्पियनला मिळाले इतके कोटी, वाचा कोणाला किती बक्षीस मिळाले

आशिया चषकाचा 15वा हंगाम काल संपला. काल रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : आशिया चषकाचा (Asia Cup) 15वा हंगाम काल संपला. काल रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला. श्रीलंकेने (Sri Lanka) 2014 नंतर प्रथमच विजेतेपद पटकावले. टीम श्रीलंकाचे एकूण सहावे विजेतेपद आहे. भारताने सर्वाधिक 7 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. तर टीम पाकिस्ताने फक्त 2 वेळा जिंकली आहे. फायनलमध्ये पहिल्यांदा खेळताना श्रीलंकेने 6 गडी गमावत 170 धावा केल्या.

श्रीलंकेच्या (Sri Lanka) भानुका राजपक्षेने नाबाद 71 धावा केल्या आणि तो सामनावीर ठरला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 20 षटकांत 147 धावांवर गारद झाला. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा अफगाणिस्तानकडून 8 विकेट्सने पराभव झाला होता. यानंतर सलग ५ सामने जिंकून संघाने विजेतेपद पटकावले.

ही स्पर्धा आशियाई क्रिकेट परिषदद्वारे आयोजित केली जाते. फायनल जिंकल्यानंतर श्रीलंकेला(Sri Lanka) चॅम्पियन म्हणून 1.50 लाख डॉलरची बक्षीस रक्कम मिळाली. म्हणजेच सुमारे 1.20 कोटी रुपये. दुसरीकडे, उपविजेत्या पाकिस्तानला 75000 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 60 लाख रुपये मिळाले. पुरस्कार वितरण सोहळ्यात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीही उपस्थित होते.

लेगस्पिनर आणि अष्टपैलू वानिंदू हसरंगा मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याने टी-20 स्पर्धेतील 6 सामन्यात 19 च्या सरासरीने 9 विकेट घेतल्या. 21 धावांत 3 बळी ही सर्वोत्तम कामगिरी. त्याचबरोबर त्याने फलंदाजीही चांगली केली. 22 च्या सरासरीने 66 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट 150 होता. अंतिम सामन्यात त्याने 21 चेंडूत 36 धावा केल्या. स्ट्राइक रेट 171 होता. त्यानंतर 27 धावांत 3 बळी घेतले. त्याने एकाच षटकात 3 बळी घेत टीम पाकिस्तानला अडचणीत आणले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejaswini Pandit: महाराष्ट्र हरलास तू ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी पोस्ट, म्हणाली...

Dharmarao Baba Atram: शरद पवारांचं राजकारण संपलं, विजयी होताच धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान

Belapur : संदीप नाईकांचा 377 मतांनी निसटता पराभव, अपक्ष संदीप नाईकांना 513 मते, तुतारीसारख्या ट्रम्पेटलाही भरघोस मते

Yashasvi Jaiswal: पर्थवर यशस्वी जयस्वाल नावाचं तुफान; कांगारू गोलंदाजांची धुलाई करत ठोकलं शतक

Maharashtra News Live Updates: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लवकरच महायुती सामोरे जाणार

SCROLL FOR NEXT