Asia Cup 2022 : हसरंगाची कमाल अन् लंकेची धमाल, श्रीलंका चॅम्पियन, पाकिस्तानचा दारूण पराभव

फिरकीपटू वानिंदू हसरंगाने एका षटकात तीन फलंदाजांना बाद केलं, त्यानंतर...
srilanka against pakistan in asia cup
srilanka against pakistan in asia cup saam tv
Published On

दुबई : आशिया करंडक स्पर्धा २०२२ चा अंतिम सामना श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात झाला. आजच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेने २० षटकांत १७० धावा केल्या. त्यानंतर १७१ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानची श्रीलंकेच्या गोलंदाजांनी पुरती दमछाक केली. फिरकीपटू वानिंदू हसरंगाने एका षटकात तीन फलंदाजांना बाद करून आशिया कपच्या विजयाच्या दिशेनं कूच केली. १७१ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या पाकिस्तानने सर्वबाद १४७ धावा केल्या. त्यामुळे आशिया करंडक स्पर्धा २०२२ मध्ये श्रीलंकेनं विजय संपादन केलं.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या श्रीलंकेला पाकिस्तानचा गोलंदाज नसीम शाहने पहिला धक्का दिला. श्रीलंकेची फक्त दोनच धावसंख्या झाली असताना कुसल मेंडीसचा शाहने त्रिफळा उडवला. मेंडिस शुन्यावर बाद झाल्यामुळे श्रीलंकेची पॉवर प्ले मध्ये खराब सुरुवात झाली. त्यानंतर पाकिस्तानच्या हारिस रौऊफने चौथ्या षटकात पथूम निसंकाला अवघ्या ८ धावांवरच पव्हेलिनचा रस्ता दाखवला. मात्र, श्रीलंकेचा स्टार खेळाडू भानुका राजापक्षाने आक्रमक खेळी करत ४५ चेंडूत नाबाद ७१ धावा कुटल्या.

srilanka against pakistan in asia cup
'आमचं ध्येय विश्वचषकच', शतक ठोकल्यानंतर रोहित शर्माने विराट कोहलीची घेतलेली मजेशीर मुलाखत वाचा

तर सहाव्या षटकात दनुष्का गुणतिलकाला त्रिफळाचीत केला. गुणतिलकालाने एकच धाव केल्याने श्रीलंकेला धावांची गती मंदावली. श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने चौफेर फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. २१ चेंडूत ३६ धावांची आक्रमक खेळी केल्यानंतर हारिस रौऊफने हसरंगाला बाद केलं.

पाकिस्तान आणि श्रीलंकेनं भारताचा पराभव करत आशिया स्पर्धेत अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी मैदानात कंबरी कसली. ग्रुप स्टेजमध्ये श्रीलंकेला विजयी सूर गवसला नाही. परंतु, त्यानंतर श्रीलंकेच्या संघान चमकदार कामगिरी करत सुपर ४ मध्ये शेवटच्या सामन्यापर्यंत मजल मारली आणि पाकिस्तान विरुद्ध अंतिम सामन्यात प्रवेश केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com