Asia Cup 2022 Schedule Saam Tv
Sports

Asia Cup 2022 Schedule: भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार सामना, आशिया कपचे वेळापत्रक जाहीर

आशिया कप 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ 28 ऑगस्ट रोजी आमनेसामने येणार आहेत.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: आशिया कप 2022 मध्ये भारत (Team India) आणि पाकिस्तान क्रिकेट संघ 28 ऑगस्ट रोजी आमनेसामने येणार आहेत. हा सामना दुबईत होणार आहे. आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले. 27 ऑगस्ट रोजी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल.

या स्पर्धेचे यजमानपद आधी श्रीलंका घेणार होते, मात्र राजकीय गोंधळामुळे आता आशिया कपचे वेळापत्रक यूएईमध्ये होणार आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना 11 सप्टेंबर रोजी दुबईत खेळवला जाणार आहे. यानंतर T20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत दुबई, संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे T20 फॉर्मेटमध्ये खेळल्या जाणाऱ्या स्पर्धेचे वेळापत्रक ट्विटरवर जाहीर केले. जय शाह हे आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) प्रमुख आहेत. त्यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

'प्रतीक्षेची घडी संपली. 27 ऑगस्टपासून आशियाई क्रिकेटमधील वर्चस्वाची लढाई. फायनल 11 सप्टेंबरला होईल. आशिया चषकाचा 15 वा मोसम टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी आदर्श ठरेल., असं ट्विट जय शाह यांनी केले आहे.

भारताला (Team India) पाकिस्तान आणि क्वालिफायर संघासोबत अ गटात तर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश ब गटात आहेत. यूएई, कुवेत, हाँगकाँग आणि सिंगापूरचा एक संघ भारत आणि पाकिस्तान या गटात सामील होईल.

याअगोदर आशिया कप T20 मध्ये भारत आणि पाकिस्तानचा संघ 2016 मध्ये एकदाच आमनेसामने आला होता. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ 14 वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने 8 तर पाकिस्तानने सहा सामन्यांत विजय मिळवला आहे.

अ आणि ब गटातील अव्वल दोन संघ सुपर 4 फेरीसाठी पात्र ठरतील. अशा परिस्थितीत 4 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होऊ शकतो. कारण दोघेही सुपर 4 साठी पात्र ठरतील अशी अपेक्षा आहे. सुपर 4 मधील अव्वल दोन संघांमध्ये 11 ऑगस्ट रोजी अंतिम सामना होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT