
बर्मिंगहॅम : काॅमन वेल्थ गेम्समध्ये (common wealth games 2022) भारतीय वेटलिफ्टरनं बर्मिंगहॅम (barmingham) येथे सात पदकांची (Medal) कमाई केली आहे. आज पूनम यादवला (punam yadav) साजेशी कामगिरी करताना आली नाही. तिच्याकडून आज पदकाची अपेक्षा हाेती मात्र ती पुर्ण न झाल्याने देशातील क्रीडाप्रेमी नाराज झाले. (Punam Yadav Latest Marathi News)
पूनम महिलांच्या ७६ किलो वजनी गटात देशाचे (india) प्रतिनिधित्व केले. स्नॅचच्या पहिल्या प्रयत्नात ती ९५ किलो वजन उचलेल अशी अपेक्षा हाेती. मात्र ती फाेल ठरली. दुसऱ्या प्रयत्नात तिला यश आले. तिसऱ्या प्रयत्नात पूनमने 98 किलो वजन उचलले. क्लीन अँड जर्कमध्ये देखील देखील पूनमची कामगिरी निराशजनक ठरली. (common wealth games 2022)
कॅनडाच्या माया लेलरने शंभर किलो वजन उचलले असून सध्या ती पहिल्या स्थानावर आहे. नौरूच्या मॅक्सिमा यूएपा आणि नायजेरियाच्या तैवो लियाडी यांनी ९६-९६ किलो वजन उचलले आहे. इंग्लंडची डेबोरा इलावोडे आणि ऑस्ट्रेलियाची एबोनी गोरिंकू यांनी ९३-९३ किलो वजन उचलले आहे. (punam yadav news)
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (सन 2018) पूनमने सुवर्णपदक जिंकले हाेते. यावेळीही तिच्याकडून सुवर्णपदक जिंकण्याची अपेक्षा होती. क्लीन अँड जर्कच्या तिसऱ्या प्रयत्नात पूनमने वजन उचलले. पण, पंचांच्या संकेतापूर्वी तिने बारबेल खाली ठेवला आणि तिची लिफ्ट अपात्र ठरली. भारतीय संघानेही रेफ्रींच्या निर्णयाला आव्हान दिले होते पण खेळ ज्युरींनी तो फेटाळून लावला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.