Asia Cup IND vs HK  saam tv
क्रीडा

Asia Cup IND vs HK : भारताचा हाँगकाँगवर दणदणीत विजय; संघ सुपर ४ मध्ये दाखल

Vishal Gangurde

India vs Hong Kong Match : आशिया कप स्पर्धेत आज, बुधवारी भारताचा हाँगकाँग विरुद्ध रंगतदार सामना पाहायला मिळाला. भारतीय (Team India) फलंदाज जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरले होते. भारतीय फलंदाजांनी जोरदार बँटिग करत हाँगकाँगला जिंकण्यासाठी १९३ धावांचं आव्हान दिलं. मात्र, या आव्हानाचा सामना करण्यासाठी उतरलेल्या हाँगकाँग संघाचा गाशा भारताने १५२ धावांत गुंडाळला. त्यामुळे भारताने हाँगकाँगचा पराभव केल्याने सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे.

भारताच्या १९३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरेलल्या हाँगकाँगच्या फलंदाजांची सुरुवात खराब झाली. अर्शदीप सिंगने मुर्तझाला ९ धावांवर बाद केले. त्यानंतर निझाकत खान आणि बाबर ह्यात यांनी संयमी खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु रविंद्र जडेजाने निझाकत खानला १० धावांवर बाद केले.

निझाकत बाद झाल्यानंतर हयातने आक्रमक खेळी करत धावांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. मात्र, जडेजाने हयातला ४१ धावांवर बाद केले. किंचित शाहने देखील ३० धावांची खेळी खेळली. किंचित शाहने भुवनेश्वरला बाद केले. आवेशनेही इजाज खानची विकेट घेत स्वतःचे खाते उघडले. भारताने हाँगकाँगचा २० षटकात ५ बाद १५२ धावांत गाशा गुंडाळला. भारताकडून आवेश खान, अर्शदीप सिंग, रविंद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी १ विकेट घेतली.

दरम्यान, पाकिस्तानला धूर चारल्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी सुरुवातीला संयमी खेळ सुरू केला. भारताला पहिला धक्का रोहित शर्माच्या रुपात मिळाला. रोहित शर्माने १३ चेंडूत २१ धावा करून तंबूत परतला.

रोहितच्या विकेटनंतर मैदानात तळ ठोकून राहिलेल्या विराट कोहली आणि केएल राहुल यांनी संघाची मदार सांभाळली. मात्र, मोहम्मद गजानफरने केएल राहुलला बाद केले. त्यानंतर हाँगकाँग गोलंदाजांचा सामना करण्यासाठी उतरलेल्या सूर्यकुमार यादवची जोरदार बँटिग पाहायला मिळाली. विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी ९८ धावांची भागीदारी केली.

हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने तुफान बँटिग केली. कोहलीने ४० चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तर सूर्यकुमारची देखील चमकदार खेळी पाहायला मिळाली. सूर्यकुमारने सामन्यात चार षटकार ठोकले. एकंदर भारतीय फलंदाजांनी एकूण १९२ धावा केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT