Rohit Sharma ind vs Pak saam tv
क्रीडा

IND vs Pak : रोहित शर्मा आऊट होताच टीम इंडियाची नवी चाल; पाकिस्तान बुचकळ्यात

रोहित शर्मा बाद होताच टीम इंडियाने नवी चाल खेळली.

Satish Daud

दुबई : आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना सुरू आहे. पाकिस्तानने भारताला विजयासाठी १४८ धावांचं लक्ष दिलं आहे. धावसंख्येचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरूवात थोडी संथ झाली. पहिल्या ६ षटकात टीम इंडियाला फक्त ३८ धावा करता आल्या. केएल राहूल शून्य धावावर बाद झाल्यानंतर रोहित आणि विराट कोहलीने धावगती वाढवली. मात्र टीम इंडियाचा स्कोर ५६ असताना रोहित शर्मा बाद झाला. दरम्यान, रोहित शर्मा बाद होताच टीम इंडियाने नवी चाल खेळली. (IND vs Pak Latest Updates)

सुर्यकुमार यादवच्या आधी टीम इंडियाने डावखुरा फलंदाज रविंद्र जडेजाला फलंदाजीसाठी पाठवलं. पाकिस्तानचा संघाला विकेट्स पडल्यानंतर सुर्यकुमार यादव हा फलंदाजीसाठी येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, टीम इंडियाने जडेजाला फलंदाजीसाठी पाठवून पाकिस्तानला बुचकाळ्यात टाकलं. दरम्यान, फलंदाजीसाठी उतरलेल्या रविंद्र जडेजाने पहिल्या २९ चेंडूत ३४ धावा केल्या.

दरम्यान, रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीसुद्धा बाद झाला विराटने ३४ चेंडूत ३५ धावा केल्या. अखेरीस भारतीय संघाने हा सामना ५ विकेट्स आणि २ चेंडू राखून जिंकला. हार्दिक पांड्याने षटकार ठोकत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात ७ धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर जडेजा आऊट झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दिनेश कार्तिकने दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर ४ चेंडूत भारतीय संघाला ६ धावांची गरज असताना, हार्दिकने तिसरा चेंडू सांभाळून खेळला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार लगावत त्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम हे दोन खेळाडू सलामीला आलेत. सलामीला आल्यानंतर मोहम्मद रिझवान आणि बाबर ही जोडी चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र तिसऱ्या षटकात बाबर आझम (१०) झेलबाद झाला. त्यानंतर संघाच्या ४२ धावा झालेल्या असताना दुसऱ्या विकेटसाठी आलेला फकर झमन (१०) आवेश खानच्या चेंडूवर झेलबाद झाला.

त्यानंतर इफ्तिखार अहमद आणि मोहम्मद रिझवान या जोडीने पाकिस्तानी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अहमद २८ धावा करून हार्दिक पंड्याच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानतर मोहम्मद रिझवानने मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ४३ धावांवर असताना हार्दिक पंड्याने त्याला बाद केलं. त्यानंतर मात्र पाकचा एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. पाकिस्तानचा संघ १९.५ षटकांत १४८ धावा करू शकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

VIDEO : महायुतीची मुसंडी, अमित शहांकडून फडणवीसांचं अभिनंदन | Marathi News

Kinshuk Vaidya : शुभ मंगल सावधान! 'शाका लाका बूम बूम' फेम संजूच्या डोक्यावर पडल्या अक्षता, गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार

SCROLL FOR NEXT