R Ashwin and Ravindra Jadeja
R Ashwin and Ravindra Jadeja  Saam tv
क्रीडा | IPL

Ashwin-Jadeja:आर अश्विन - रवींद्र जडेजा जोडी सुपरहिट! लवकरच अनिल कुंबळे - हरभजन सिंगच्या जोडीचा विक्रम मोडत बनणार नंबर १

Saam TV News

R Ashwin -Ravindra Jadeja: क्रिकेट इतिहासात अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांची जोडी सर्वात यशस्वी जोडी आहे. मात्र सध्या भारतीय क्रिकेटमध्ये एक जोडी सूपरहिट ठरतेय ती म्हणजे आर अश्विन आणि रवींद्र जडेजाची जोडी.

येत्या काही दिवसात भारतीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांची जोडी बनण्याची नामी संधी आर अश्विन आणि रवींद्र जडेजाकडे असणार आहे. (Latest Sports Updates)

अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांची जोडी ही कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारी जोडी आहे. आता या यादीत आर अश्विन आणि रवींद्र जडेजाची जोडी अव्वल स्थानी येऊ शकते.

अनिल कुंबळे आणि हरभजन सिंगच्या जोडीने ५४ कसोटी सामन्यांमध्ये ५०१ गडी बाद केले होते.यामध्ये अनिल कुंबळे यांनी २८१ तर हरभजन सिंगने २२० गडी बाद केले होते.

तर रवींद्र जडेजा आणि आर अश्विनच्या जोडीने ४५ सामन्यांमध्ये ४६२ गडी बाद केले आहेत. या दोघांची कामगिरी पाहता, येत्या ४ ते ५ सामन्यात आर अश्विन आणि रवींद्र जडेजाची जोडी अनिल कुंबळे आणि हरभजन सिंगच्या जोडीला मागे सोडू शकते.

तुम्ही त्यांच्या जोरदार कामगिरीचा अंदाज यावरून लावू शकता की, २ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी मिळुन ३१ गडी बाद केले आहेत. आतापर्यंत आर अश्विनने २४८ तर जडेजाने २१४ गडी बाद केले आहेत.

अनिल कुंबळे आणि हरभजन सिंगची जोडी येण्यापूर्वी आणखी एक जोडी जगप्रसिद्ध होती. तो म्हणजे बिशन सिंग बेदी आणि बीएस चंद्रशेखर यांची जोडी. दोघांनी मिळून ४२ कसोटी सामन्यांमध्ये ३६८ गडी बाद केले होते.

अनिल कुंबळे - हरभजन सिंग, आर अश्विन - रवींद्र जडेजा यांच्या जोडीनंतर बिशन सिंग बेदी आणि बीएस चंद्रशेखर यांची जोडी ही सर्वाधिक गडी बाद करणारी जोडी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nigeria Bomb Blast: प्रॉपर्टीच्या वादातून प्रार्थनास्थळात बॉम्बस्फोट; ८ जणांचा मृत्यू, १६ जखमी

Mumbai Lok Sabha: मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; शिवाजी पार्कवर PM मोदी अन् राज ठाकरे, तर बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

Daily Horoscope: कष्टाला पर्याय नाही, 'या' ३ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार; तुमच्या राशीत काय?

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

SCROLL FOR NEXT