Ashes: कमिन्सच्या गोलंदाजीपुढे इंग्लंड फेल; पॅटच्या नावावर नवा रेकॉर्ड Twitter
Sports

Ashes: कमिन्सच्या गोलंदाजीपुढे इंग्लंड फेल; पॅटच्या नावावर नवा रेकॉर्ड

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यातील प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या अॅशेस कसोटी (Ashesh Series 2021) मालिकेला सुरुवात झाली आहे.

वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यातील प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या अॅशेस कसोटी (Ashesh Series 2021) मालिकेला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने सुरवातीलाच सामन्यावर आपली पकड मिळवली आहे. ब्रिस्बेन येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 147 धावांत गुंडाळला. कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच ऑस्ट्रेलियाचे कर्णधार पद भुषवणाऱ्या पॅट कमिन्सने (Pat Cummins) गोलंदाजीत आपली करामत दाखवत 5 बळी घेतले.

इंग्लंडचा सलामीवीर रॉरी बर्न्स, कर्णधार जो रूट आणि ऑली रॉबिन्सन खाते न उघडता बाद झाले. डेव्हिड मलान (06), बेन स्टोक्स (05), मार्क वुड (08), जॅक लीच (02) यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. जोस बटलरने महत्त्वाची खेळी खेळली. त्याने 58 चेंडूत 39 धावा केल्या. हसीब हमीदने 25 धावांची खेळी खेळली. ओली पोपने 35 धावा केल्या. एका क्षणी संघ 100 धावांचा टप्पाही पार करणार नाही असे वाटत होते, पण बटलर आणि नंतर ऑली पोपच्या महत्त्वपूर्ण खेळीने संघाला 147 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले आहे.

कर्णधार पॅट कमिन्सने पाच बळी घेत इतिहास रचला. पदार्पणाच्या कसोटीत अशी कामगिरी करणारा तो दुसरा ऑस्ट्रेलियन कर्णधार ठरला आहे. पॅट कमिन्सने बेन स्टोक्सच्या रूपात सामन्यातील पहिली विकेट घेतली. त्यानंतर त्याने हसीब हमीद, ख्रिस वोक्स, ऑली रॉबिन्सन आणि मार्क वूडचा पाच बळी घेतला.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना भाऊबीज कधी मिळणार? ऑक्टोबर हप्त्याबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्वाची अपडेट

Morning symptom of cancer: सकाळी उठल्याबरोबर सर्वात पहिलं दिसतं कॅन्सरचं हे लक्षण; 99% लोकं करतात इग्नोर

Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला बायकोने नवऱ्याला का ओवाळावे? जाणून घ्या जुनं शास्त्र

Diwali Photo Tips: दिवाळीत फोटो कसे क्लिक करावे? प्रोफेशनल लुकसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स

Thamma OTT Release : रश्मिकाचा 'थामा' चित्रपट ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार? वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT