इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यातील अॅशेस (Ashes Series 2021) ही प्रसिद्ध कसोटी मालिका बुधवारपासून सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाने आपली प्लेईंग 11 जाहीर केली आहे, तर इंग्लंडने नाणेफेकीपूर्वी प्लेइंगची 11 ची घोषणा केली आहे. याआधी इंग्लंडच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. स्टार गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) पहिल्या कसोटीत खेळणार नाही. त्याच वेळी, स्टुअर्ट ब्रॉडबद्दल एक अपडेट देखील आले आहे.
Calf Injury मुळे अँडरसन पहिल्या कसोटीत खेळणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. इंग्लंडच्या संघाला 39 वर्षीय गोलंदाजासोबत कोणताही धोका पत्करायचा नाही. अँडरसन शेवटच्या अॅशेस मालिकेत पहिली चार षटके टाकल्यानंतर दुखापतीमुळे बाहेर पडला होता. अँडरसनने अॅडलेडमधील दुसऱ्या कसोटीत खेळावे, असे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे. सर्वाधिक कसोटी क्रिकेट खेळणारा 39 वर्षीय जेम्स अँडरसन हा चौथा खेळाडू आहे. अँडरसनने 166 कसोटीत 632 विकेट घेतल्या आहेत. भारताविरुद्ध तो जबरदस्त फॉर्ममध्ये होता. अशा स्थितीत अँडरसनची पहिल्या कसोटीतून बाहेर पडणे हा इंग्लंडसाठी मोठा धक्का आहे.
जेम्स अँडरसनच्या जागी पहिल्या कसोटीत ख्रिस वोक्सला संधी मिळू शकते. त्यांच्याशिवाय मार्क वुड आणि ऑली रॉबिन्सन यांचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केला जाऊ शकतो. स्टुअर्ट ब्रॉड पहिल्या कसोटीत खेळेल की नाही, याबाबत साशंकता आहे. संघ फिरकी गोलंदाज जेक लीचला संघात स्थान देण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे स्टुअर्ट ब्रॉड ऑगस्टपासून क्रिकेटपासून दूर होता. पावसामुळे सराव फारसा करता आला नाही. ब्रॉडला पहिल्या दोन कसोटींपैकी कोणत्याही एका सामन्यात घेतले जाऊ शकते. इंग्लंडचा संघ आज आपला १३ जणांचा संघ जाहीर करु शकतो.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.