Premier League: आर्सेनलचा पराभव करून एव्हर्टन पुन्हा विजयाच्या मार्गावर

सामना संपल्यानंतर एव्हर्टनच्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये आनंद साजरा केला.
Premier League
Premier LeagueTwitter
Published On

लिव्हरपूल : एव्हर्टनने इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत डेमराय ग्रेच्या शेवटच्या मिनिटात केलेल्या गोलच्या जोरावर आर्सेनलचा 2-1 असा पराभव करून आठ सामन्यांमध्ये पहिला विजय नोंदवला आहे. दुसऱ्या हाफच्या 'इंज्युरी टाइम'च्या दुसऱ्याच मिनिटाला ग्रेने विजयी गोल केला. तत्पूर्वी, रिचर्डसनने ७९ व्या मिनिटाला एव्हर्टनला बरोबरी साधून दिली होती. पहिल्या हाफच्या इंज्युरी टाईमच्या वेळेत मार्टिन डेगार्डने गोल करून आर्सेनलला आघाडी मिळवून दिली.

Premier League
लाकडापासून बनवली हुबेहूब शिवशाही; महाडच्या अवलिया सुताराची किमया

सामना संपल्यानंतर एव्हर्टनच्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये आनंद साजरा केला. तत्पूर्वी, 27 मिनिटांचा खेळ संपल्यानंतर काही एव्हर्टन समर्थकांनी क्लबच्या अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ सामन्यावर बहिष्कार टाकत स्टेडियम सोडले होते. आर्सेनलचा हा सलग दुसरा पराभव आहे. याआधी गुरुवारी मँचेस्टर युनायटेडने 3-2 ने पराभूत केले होते. मागच्या सामन्यात रोनाल्डोने आपल्या 800 गोलचा टप्पा देखील पुर्ण केला होता.

दरम्यान पोर्तुगालचा महान खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलमुळे मँचेस्टर युनायटेडने गुरुवारी इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत आर्सेनलवर 3-2 असा रोमहर्षक विजय नोंदवला होता. रोनाल्डोने सामन्याच्या 52 व्या मिनिटाला गोल करत क्लब आणि देशासाठी 800 गोलचा टप्पा पूर्ण केला. त्यानंतर त्याने 70 व्या मिनिटाला पेनल्टीचे गोलमध्ये रुपांतर करून संघाचा विजय निश्चित केला. तत्पूर्वी, आर्सेनलसाठी एमिल स्मिथने 14 व्या मिनिटाला आणि मार्टिन ओडेगार्डने 54 व्या मिनिटाला, तर ब्रुनो फर्नांडिसने 44 व्या मिनिटाला मँचेस्टर युनायटेडकडून गोल केला. दिग्गज जर्मनीचे प्रशिक्षक राल्फ रेग्निक यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारण्यापूर्वी मँचेस्टर संघाने विजयाची नोंद केली.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com