arshdeep singh twitter
क्रीडा

IND vs AFG, Super 8: अर्शदीप सिंगला नंबर 1 बनण्यासाठी 1 विकेटची गरज; रोहित अन् विराटमध्येही चुरशीची लढत

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने साखळी फेरीतील सामन्यांमध्ये ४ पैकी ३ सामने जिंकले. तर १ सामना हा पावसामुळे रद्द झाला. भारतीय संघ आता सुपर ८ फेरीतील सामने खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना हा २० जून रोजी अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यात भारतीय संघातील युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला मोठा रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे.

अर्शदीप सिंगकडे नंबर १ बनण्याची संधी

अर्शदीप सिंगने या संपूर्ण स्पर्धेत डावाच्या सुरुवातीलाच विकेट्स घेत भारतीय संघाला दमदार सुरुवात करुन दिली आहे. त्याने या स्पर्धेतील ४ सामन्यांमध्ये ७ गडी बाद केले आहेत. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यातही त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

दरम्यान या सामन्यात १ विकेट घेताच त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद होणार आहे. १ विकेट घेताच त्याला भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनण्याची संधी असणार आहे. सध्या तो फरीद अहमद, आर अश्विन आणि भुवनेश्वर कुमारनंतर चौथ्या स्थानी आहे. या तिन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी ५-५ विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीप सिंगच्या नावेही ५ विकेट्स घेण्याची नोंद आहे.

अर्शदीप सिंगसह विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांमध्येही स्पर्धा रंगणार आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये विराट कोहलीने सर्वाधिक २०१ धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने १९६ धावा केल्या आहेत. त्यामुळे या सामन्यात ज्याची बॅट चालली तो या यादीत नंबर १ बनेल.

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनाही सुर गवसलेला नाही. विराटने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सर्नाविध धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. त्याने ११४६ धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माच्या नावे १०३१ धावा करायच्या आहेत. विराटला याबाबतीत मागे सोडायचं असेल, तर रोहितला मोठी खेळी करावी लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : निक्कीच्या प्रेमात अरबाजची तहान भूक हरपली, मनधरणी करत म्हणाला…

Relationship Tips : रोजच्या भांडणांमुळे नातं तुटण्याची भीती वाटतेय? आजपासून 'या' टिप्स नक्की फॉलो करा

IND vs BAN: कर्णधार सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा; पहिल्या सामन्यात 'हा' फलंदाज करणार ओपनिंग!

Marathi News Live Updates : डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का

Walnut Benefit: दररोज अक्रोड खाण्याचे चमत्कारिक फायदे

SCROLL FOR NEXT