Arjun tendulkar stunned ishan kishan by his toe crushing yorker video viral twitter
Sports

Arjun Tendulkar Viral Video: अर्जुनच्या घातक गोलंदाजीवर इशानची बत्ती गुल! यॉर्कर चेंडूवर आडवाच पडला - Video

IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी सर्व संघांनी कंबर कसली आहे. मुंबई इंडियन्स संघाने देखील जोरदार सराव करायला सुरुवात केली आहे.

Ankush Dhavre

Arjun Tendulkar- Ishan Kishan:

आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी सर्व संघांनी कंबर कसली आहे. मुंबई इंडियन्स संघाने देखील जोरदार सराव करायला सुरुवात केली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देखील सराव करण्यासाठी मैदानात उतरला आहे. गेल्या २ वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघासाठी खेळत असलेल्या अर्जुनला गेल्या वर्षी पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. दरम्यान आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी तो कसून सराव करताना दिसून आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गेल्या वर्षी अर्जुनला ४ सामने खेळण्याची संधी मिळाली होती. या वर्षीही संघात स्थान मिळवण्यासाठी तो कसून सराव करतोय. दरम्यान मुंबई इंडियन्सने त्याचा नेट्समध्ये गोलंदाजी करत असल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात तो आपल्या भेदक माऱ्याने इशान किशनची बत्ती गुल करताना दिसून येत आहे. (Cricket news in marathi)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अर्जुन तेंडुलकर रनअप घेऊन धावत येतो. त्यावेळी इशान किशन नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत असतो. तो इशानला असा काही यॉर्कर चेंडू टाकतो जो इशान किशनच्या पायाला जाऊन लागतो. या चेंडूवर त्याचा तोल जातो आणि तो आपटतो. त्यानंतर पुढचा चेंडूही तो यॉर्कर टाकतो. हा चेंडूही त्याला खेळता येत नाही.

अर्जुन तेंडुलकरला मुंबईने आपल्या संघात कायम ठेवलं. गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. या हंगामात त्याला ४ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ३०.६७ च्या सरासरीने ३ गडी बाद केले. यादरम्यान फलंदाजी करताना १३ धावा केल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT