Arjun Tendulkar Selection: अर्जुनचं नशीब उजळलं! IPL स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या बळावर संघात मिळालं स्थान..

Arjun Tendulkar IPL 2023: त्याला आणखी एका मोठ्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे.
arjun tendulkar
arjun tendulkarsaam tv
Published On

Arjun Tendulkar News: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आयपीएल २०२३ स्पर्धेत खेळताना दिसून आला होता. या स्पर्धेत खेळताना त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांची मनं जिंकली होती. आता त्याला आणखी एका मोठ्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे.

arjun tendulkar
Team India New Jersey: जत्रेतून आणलीये का?, टीम इंडियाची नवी जर्सी पाहून फॅन्स संतापले

पाँडिचेरी येथे होणाऱ्या देवधर ट्रॉफी स्पर्धेसाठी अर्जुन तेंडुलकरला वेस्ट झोनच्या संघात स्थान देण्यात आले आहे. या स्पर्धेत तो मयांक अगरवालच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून येणार आहे. या स्पर्धेला २४ जुलैपासून प्रारंभ होणार आहे. तर कोलंबो येथे पार पडणाऱ्या एमर्जींग आशिया चषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या साई सुदर्शनला राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे.

अर्जुनचं नशीब उलळलं ..

डाव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियन्स संघासाठी पदार्पण केले होते. अर्जुनची कामगिरी पाहता बीसीसीआयने त्याची एमार्जिंग ऑल राऊंडर्सच्या सराव शिबिरासाठी निवड केली होती. साऊथ झोनच्या संघात अर्जुन तेंडुलकरसह कर्नाटकच्या विद्वत कापेरावा, विजयकुमार विशाक आणि कौशिकला स्थान देण्यात आले आहे. (Latest sports updates)

arjun tendulkar
Team India Playing 11: पहिल्या कसोटीत 'या' 3 खेळाडूंचं नशीब उजळणार! पंत सारखाच आक्रमक खेळाडू करणार पदार्पण

अर्जुन तेंडुलकरला सचिन तेंडुलकरचा मुलगा म्हणून ओळखलं जातं. मात्र त्याला आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे. यासाठी तो कसून मेहनत घेताना दिसून येत आहे. त्याच्या आयपीएल २०२३ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याला या स्पर्धेत ४ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याला ३ गडी बाद करता आले आहेत. तर फलंदाजी करताना त्याने १३ धावा केल्या आहेत.

असा आहे संघ:

मयांक अगरवाल (कर्णधार), रोहन कुन्नुमल, एन जगदीशन, रोहित रायुडू, केबी अरूण कार्तिक, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, वॉशिंग्टन सुंदर, विद्वत कावेरापा, विजयकुमार विशाक, कौशिक वी, रोहित रेडकर, सिजोमन जोसेफ, अर्जुन तेंडुलकर आणि साई किशोर.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com