arjun tendulkar left the ground after nicholas pooran hits back to back sixes wath video amd2000 twitter
क्रीडा

Arjun Tendulkar- Nicholas Pooran: पूरनचे लागोपाठ २ षटकार अन् अर्जुन तेंडुलकरने मैदानच सोडलं! नेमकं काय घडलं?

Ankush Dhavre

मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२४ स्पर्धेतून आधीच बाहेर पडला होता. त्यामुळे त्यांनी लखनऊ सुपरजायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात अर्जुन तेंडुकरला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली. हा त्याचा या हंगामातील पहिलाच सामना होता. अर्जुनने सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये शानदार गोलंदाजी केली. (MI vs LSG)

मात्र ज्यावेळी तो निकोलस पूरनसमोर गोलंदाजी करायला आला त्यावेळी तो दबावाखाली आल्याचे पाहायला मिळाले. आपल्या वैयक्तिक तिसऱ्याच षटकात अर्जुन तेंडुलकरला मैदान सोडावं लागलं. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) २०२१ मध्ये झालेल्या लिलावात आपल्या संघात स्थान दिलं होतं. मात्र या हंगामात दुखापतग्रस्त झाल्याने त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर २०२३ मध्ये झालेल्या हंगामात त्याला मुंबई इंडियन्स संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध पदार्पण करताना त्याने सुरुवातीच्या २ षटकात शानदार कामगिरी केली होती. या सामन्यात अवघ्या १७ धावा खर्च केल्या होत्या. (Arjun Tendulkar)

अर्जुन तेंडुलकर उत्तम गोलंदाज आहे. तसेच फलंदाजीतही तो योगदान देऊ शकतो. मात्र त्याला मुंबई इंडियन्स संघाकडून सातत्याने खेळण्याची संधी मिळत नाहीये. या हंगामात तो आपला पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. मुंबई इंडियन्स संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या २ षटकात त्याने ९ धावा खर्च केल्या. त्यानंतर अर्जुन आपलं तिसरं षटक टाकण्यासाठी मैदानावर आला. (Nicholas Pooran)

त्यावेळी निकोलस पूरन तुफान हाणामारी करत होता. पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच अर्जुन तेंडुलकर दबावात असल्याचं दिसून आलं. चेंडू टाकण्यापूर्वी त्याला दुखापत झाली. त्याने चेंडू अंपायरकडे सोपवला. त्यानंतर त्याने पुन्हा चेंडू हातात घेतला. मात्र पहिल्याच चेंडूवर त्याची दिशाभूल झाली. त्याने लेग साईडच्या दिशेने फुल टॉस चेंडू टाकला. (Arjun Tendulkar-Nicholas Pooran)

या चेंडूवर निकोलस पूरनने लेग साईडच्या दिशेने खणखणीत षटकार मारला. त्यानंतर पुढचा चेंडूही त्याने सेम टू सेम टाकला. या चेंडूवरही त्याने षटकार मारला. त्यानंतर अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. पहिला चेंडू टाकण्यापूर्वी त्याचा पाय लचकला. त्यामुळे त्याला गोलंदाजी करताना अडचणीचा सामना करावा लागत होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT