arjun tendulkar and jemimah rodrigues saam tv
Sports

Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकर अन् जेमिमा यांच्यात आहे खास नातं; स्वत: पोस्ट शेअर करत केला खुलासा

Arjun Tendulkar And Jemimah Rodrigues: या फोटोमध्ये तिने अर्जुन तेंडुलकरसोबत असलेल्या कनेक्शनचा खुलासा केला आहे.

Ankush Dhavre

Jemimah Rodrigues Instagram Post: भारतीय महिला संघातील क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात जेमिमासोबत मुंबई इंडियन्स संघाचा स्टार क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर असल्याचे दिसून येत आहे.

अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आणि जेमिमाचा (Jemimah Rodrigues) हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे. या फोटोमध्ये तिने अर्जुन तेंडुलकरसोबत असलेल्या कनेक्शनचा खुलासा केला आहे.

जेमिमाने हा फोटो शेअर करत लिहिले की, ' अंडर -१२ च्या दिवसांपासून ते आतापर्यंत.. आम्ही एक लांबचा पल्ला गाठला आहे...' अर्जुन तेंडुलकर आणि जेमिमा आणि या दोघांनी मुंबईच्या अंडर -१२ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तेव्हापासुन हे दोघेही एकमेकांना ओळखतात. या फोटोमध्ये जेमिमाने बार्सिलोनाची जर्सी घातली आहे.

हा फोटो व्हायरल होताच अशी चर्चा सुरू झाली आहे की, टीम इंडियाची स्टार बार्सिलोनाची फॅन आहे. जेमिमा आणि अर्जुन तेंडूलकरसोबत या फोटोमध्ये प्रशिक्षक प्रशांत शेट्टी असल्याचे देखील दिसून येत आहे. (Latest sports updates)

आयपीएल २०२३ स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघासाठी पदार्पण..

अर्जुन तेंडुलकर हा भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे. अर्जुन तेंडुलकर हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोवा संघाचे प्रतिनिधित्व करतो. यासह आयपीएल स्पर्धेत तो मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. गेल्या एक वर्षांपासून तो संधीच्या शोधात होता.

मात्र त्याला संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याला या हंगामात पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. तसेच आयपीएल २०२३ स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ४ सामने खेळले. यादरम्यान त्याला ३ गडी बाद करण्यात यश आले.

तसेच जेमिमाबद्दल बोलायचं झालं तर, जेमिमा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे डान्स करतानाचे आणि गाणं गात असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात. वुमेन्स प्रिमिअर लिग स्पर्धा सुरु असताना तिचे मैदानावर डान्स करतानाचे व्हिडिओ जोरदार व्हायरल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT