fifa world cup 2022 argentina vs france Twitter/@FIFAWorldCup
Sports

FIFA WC Final: फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स आमनेसामने; गोल्डन बूटसाठी मेस्सी-एम्बाप्पे यांच्यात लढत

Argentina vs France, FIFA World Cup Final: फ्रान्स सलग दुसरा विश्वचषक जिंकण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल, तर अर्जेंटिनाचा संघही कोणतीही कसर सोडणार नाही. दोन्ही संघांनी आजपर्यंत दोनवेळा ही ट्रॉफी जिंकली आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

FIFA World Cup 2022 Final Match: फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा आज, १८ डिसेंबरला अखेरचा सामना खेळला जाणार आहे. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आज गतविजेत्या फ्रान्सचा सामना अर्जेंटिनाशी कतारच्या लुसेल स्टेडियमवर होणार आहे. फ्रान्सच्या विजयाची जबाबदारी स्टार स्ट्रायकर कीलियन एम्बाप्पे आणि ओलिवर जिरूड या खेळाडूंच्या खांद्यावर असेल. त्याचवेळी अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी अंतिम सामना जिंकून विजेतेपदासह विश्वचषकातून निरोप घेऊ इच्छितो, त्यामुळे आजचा सामना चुरशीचा होणार आहे. (FIFA World Cup 2022 Final Match Today)

आज, रविवारी होणार्‍या अंतिम फेरीत (FIFA World Cup) अर्जेंटिना आणि फ्रान्स एकमेकांशी भिडतील. अंतिम सामना अनेक प्रकारे भावनिक असेल कारण, हा मेस्सीचा शेवटचा विश्वचषक सामना असेल. मेस्सीने अनेक वर्षांपासून विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न जपले आहे आणि यावेळी त्याला ही ट्रॉफी मिळवण्याची शेवटची संधी आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होईल.

मेस्सीसमोर सध्याचा चॅम्पियन आणि बलाढ्य संघ फ्रान्स आहे, ज्याला पराभूत करणे त्याच्यासाठी सोपे नसेल. फ्रान्स सलग दुसरा विश्वचषक जिंकण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करेल, तर अर्जेंटिनाचा संघही कोणतीही कसर सोडणार नाही. दोन्ही संघांनी आजपर्यंत दोनवेळा ही ट्रॉफी जिंकली आहे.

अर्जेंटिनाने 1978 आणि 1986 मध्ये तर फ्रान्सने 1998 आणि 2018 मध्ये विजेतेपद पटकावले होते. अर्जेंटिनाला ३६ वर्षांनंतर प्रथमच विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. यासोबतच फ्रान्स सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावण्यापासून एक पाऊल दूर आहे. (Latest Marathi News)

एम्बाप्पे आणि मेस्सीसाठी योजना

दोन्ही संघांचे प्रशिक्षक मेस्सी आणि एम्बाप्पे यांना गोल करू नये म्हणून त्यांना घेरण्याचा प्रयत्न करतील. याचा फायदा इतर खेळाडूंना मिळू शकतो आणि त्यांना गोल करण्याची संधी मिळू शकते. मेस्सी याआधीही फायनलमध्ये (Football) खेळला आहे, पण 2014 मध्ये त्याचा संघ जर्मनीकडून पराभूत झाला होता. एम्बाप्पे असताना फ्रान्सने 2018 मध्ये क्रोएशियाचा पराभव करून विश्वचषक जिंकला होता.

मेस्सीची तुलना महान मॅराडोनाशी

मेस्सीने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर अर्जेंटिनाला अंतिम फेरीत नेले. त्याची तुलना महान फुटबॉलपटू मॅराडोनाशी केली जात आहे. मेस्सीने तीन असिस्ट व्यतिरिक्त पाच गोल केले आणि आपल्या संघाच्या चाहत्यांना रोमांचित केले.

या खेळाडूंवर असेल लक्ष

अर्जेंटिना

लिओनेल मेस्सी: 35 वर्षीय मेस्सीने आतापर्यंत स्पर्धेत पाच गोल केले आहेत आणि तो संयुक्तपणे सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा गोल करण्याची संधी मिळते तेव्हा मेस्सीचा वेग पाहण्यासारखा असतो. विश्वचषक विजेतेपदामुळे त्याला दिएगो मॅराडोनाप्रमाणेच 'आयकॉन' दर्जा मिळेल.

ज्युलियन अल्वारेझ: स्पर्धेमध्ये प्रगती होत असताना अल्वारेझने चांगली कामगिरी करणे सुरू ठेवले आहे आणि त्याने आतापर्यंत चार गोल केले आहेत. या 22 वर्षीय खेळाडूचा वेगवान धावण्यात कुणीही हात धरु शकत नाही. क्रोएशियाविरुद्ध उपांत्य फेरीत संघाचा ३-० असा विजय मिळवताना त्याने मेस्सीसोबत जबरदस्त भागीदारी रचली.

एमिलियानो मार्टिनेझ: अर्जेंटिनाचा हा गोलकीपर सहा फूट चार इंच इतका उंच आहे. अंतिम सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत गेला, तर मार्टिनेझची भूमिका महत्त्वाची असेल. नेदरलँड्सविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीत आणि गेल्या वर्षीच्या कोपा अमेरिकेच्या उपांत्य फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाच्या विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

नहुएल मोलिना: मोलिनाकडे एक मजबूत डिफेंडरचे सर्व गुण आहेत. एटलेटिको मैड्रिडचा 24 वर्षीय खेळाडू हा त्याच्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो.

एन्झो फर्नांडीझ: फर्नांडीझने स्पर्धेमध्ये पर्यायी खेळाडू म्हणून सुरुवात केली होती, परंतु अर्जेंटिनाच्या मेक्सिकोविरुद्धच्या विजयात गोल केल्यानंतर टीमचा तो मुख्य खेळाडू बनला. अर्जेंटिनाच्या मिडफिल्डमधला तो महत्त्वाचा खेळाडू आहे.

फ्रान्स

कीलियन एम्बाप्पे: कीलियन एम्बाप्पे हा त्याच्या वेगवान आणि गोल करण्याच्या पराक्रमासाठी ओळखला जातो. पॅरिस सेंट-जर्मेनकडून क्लब फुटबॉल खेळणाऱ्या 23 वर्षीय या स्ट्रायकरने आतापर्यंत विश्वचषकात मेस्सीसारखेच पाच गोल केले आहेत. अर्जेंटिनाविरुद्ध जिंकल्यास तो महान खेळाडूंमध्ये सामील होईल.

अँटोनी ग्रिजमन : ३१ वर्षीय ग्रिजमन फ्रान्ससाठी या विश्वचषकात महत्त्वाचा खेळाडू असल्याचे सिद्ध झाले आहे. अंतिम फेरीत त्याची मेस्सीसोबतची लढत पाहण्यासारखी असेल. त्याने महत्त्वाच्या प्रसंगी संघातील खेळाडूंसाठी गोल करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.

ह्युगो लॉरिस: ३५ वर्षीय ह्युगो लोरिस दोन विश्वचषक जिंकणारा पहिला कर्णधार बनण्याच्या मार्गावर आहे. तो आपले काम चोखपणे पार पाडतो. फ्रान्सकडून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.

राफेल वरान : 29 वर्षीय वरान हा डिफेंटसाठी मजबूत प्लेयर आहे. स्पॅनिश संघ रिअल माद्रिदला चार वेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवून देण्यात त्याची भूमिका मोलाची ठरली आहे.

ऑरेलियन टुचोमनी: गेल्या चार वर्षांपासून पॉल पोग्बाला त्याच्या मिडफिल्ड भूमिकेत टुचोमनी याने आपली भूमिका प्रामाणिकपणे पार पाडली आहे. अर्जेंटिनाला मिडफिल्डमध्ये त्याला मागे टाकणे कठीण जाऊ शकते.

दोन्ही संघांची ताकद आणि कमकुवतता

अर्जेंटिना -

ताकद: कर्णधार लिओनेल मेस्सीवर अवलंबून आहे. इतर खेळाडूही गोल करत आहेत. पूर्वार्धात गोल करून संघ अधिक आक्रमकपणे खेळतो.

कमजोरी: टीमविरुद्ध आतापर्यंत पाच गोल झाले. डिफेंस ही संघाची कमकुवतता आहे आणि मेस्सीवर जास्त अवलंबून राहणे देखील नुकसानकारक ठरू शकते.

फ्रान्स -

ताकद: स्ट्रायकर्स ही फ्रान्सच्या संघाची ताकद आहे. एम्बाप्पे, जिरूड, ग्रीजमैन या त्रिकुटाने चमकदार कामगिरी केली आहे.

कमजोरी: डिफेंसबाबत थोडी काळजी आहे. या विश्वचषकात गतविजेत्या फ्रान्सविरुद्धही पाच गोल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT