Aniket Verma x (twitter)
Sports

Aniket Verma : हेड, क्लासेन, शर्मा.. सगळे फेल, अनिकेत वर्मा एकटाच नडला; दिल्लीची धुलाई

SRH VS DC Live Match Update : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना विशाखापट्टणमच्या स्टेडियममध्ये रंगला आहे. या सामन्यामध्ये युवा फलंदाज अनिकेत वर्मा त्याच्या खेळामुळे चमकला आहे.

Yash Shirke

SRH VS DC Live Match : विशाखापट्टणममध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत सुरु आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय हैदराबादसाठी महागात पडला. त्यांच्या संघातील पहिले चार खेळाडून लागोपाठ बाद झाले. पुढे अनिकेत वर्मा आणि हेनरिक क्लासेनने खेळ सावरला. पण त्यातही अनिकेत जास्त चमकला.

मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्यासमोर हैदराबादच्या प्रमुख फलंदाजांना नांगी टाकली. अभिषेक शर्मा, टॅव्हिस हेड, इशान किशन आणि नितीश कुमार रेड्डी सलग एकापाठोपाठ बाद होऊन माघारी परतले. त्यानंतर अनिकेत वर्माने डाव सावरला. त्याला हेरनिक क्लासेनची साथ मिळाली. मधल्या ओव्हर्समध्ये त्यांनी कधी सावधगिरीने तर कधी फटकेबाजी करत खेळ पुढे नेला.

दहाव्या ओव्हरमध्ये हेनरिक क्लासेन सुद्धा आउट झाला. पुढे अभिनव मनोहर, पॅट कमिन्स यांच्यासाथीने अनिकेत वर्मा खेळू लागला. दुसऱ्या बाजूने साथ मिळत नसतानाही अनिकेतने चांगला खेळ केला. त्याने ४१ बॉल्सवर ७४ धावा केल्या. यात ५ चौकार आणि ६ षटकार यांचा समावेश होता. पुढे पंधराव्या ओव्हरमध्ये शॉट मारण्याच्या प्रयत्नांमध्ये अनिकेत वर्माही बाद झाला. ज्या वेळेस मुख्य फलंदाज फेल झाले, तेव्हा अनिकेतने खेळ सावरुन चांगली धावसंख्या करण्यास योगदान केले. त्यामुळे अनिकेत वर्माचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हैदराबादच्या संघाने दाखवलेला विश्वास अनिकेत वर्माने सार्थकी लावला. आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये हैदराबादच्या संघाने अनिकेत वर्मावर ३० लाख रुपयांची बोली लावली होती. प्रॅक्टिस मॅचमध्ये त्याने तुफानी खेळी केली होती. अनिकेत वर्माने आजच्या सामन्यात केलेल्या खेळामुळे हैदराबादची धावसंख्या १६० पार गेली.

हैदराबादची प्लेईंग ११ -

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकिपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), झीशान अन्सारी, हर्षल पटेल, मोहम्मद शमी

दिल्लीची प्लेईंग ११ -

जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकिपर), केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourism: रत्नागिरीपासून अवघ्या पाऊण तासाच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहून सुंदर ठिकाण; निळाशार समुद्र, सोनेरी वाळू अन् लपलेलं पर्यटन रत्न

Raj Thackeray: उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरे जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर, कसा असेल दौरा? VIDEO

MNS : प्ले ग्रुपमधील चिमुरड्याला मारहाण प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शरीरावर असलेल्या बर्थमार्कमुळे कॅन्सर होऊ शकतो का?

Electric Shock : नव्या घरात जाण्याचे स्वप्न अपूर्ण; बांधकामाच्या ठिकाणी विजेचा धक्का लागून मृत्यू

SCROLL FOR NEXT