Andrew Flintoff : इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू अॅण्ड्र्यू फ्लिन्टॉपच्या कारला भीषण अपघात झाला. घटनेनंतर फ्लिन्टॉपला एअरलिफ्टद्वारे रुग्णालयात पोहोचवण्यात आलं आहे. ४५ वर्षीय क्रिकेटपटू एका कार्यक्रमाच्या एपिसोडसाठी शूटिंग करत असताना ही घटना घडली.
एका आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनलच्या कार्यक्रमासाठी शूटिंग करताना फ्लिन्टॉपच्या कारला अपघात झाला. शूटिंग करत असताना, डन्सफोल्डमध्ये हिमवृष्टी दरम्यान शूटिंग करताना त्याच्या कारला अपघात झाला. यात तो जखमी झाला आहे. (Andrew Flintoff)
शूटिंग क्रू मेंबरनं तात्काळ फ्लिन्टॉपला मदत पोहोचवली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत लवकरच माहिती देण्यात येईल, असे संबंधित आंतरराष्ट्रीय वाहिनेने निवेदनाद्वारे सांगितले आहे. द सनच्या रिपोर्टनुसार, फ्लिन्टॉपला गंभीर दुखापत झालेली नाही.
हिमवृष्टीदरम्यान रस्त्यावर बर्फाची चादर पसरली होती. अशावेळी फ्लिन्टॉप रस्त्यावरून कार घेऊन जात होता. त्याच्या कारचा वेगही कमी होता. तसेच शूटिंग करताना सर्व सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात आले होते, असे सांगण्यात आले. (Accident News)
दरम्यान, अलीकडेच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमन्ड्स याच्याही कारला अपघात झाला होता. यात त्याचा मृत्यू झाला होता. सायमन्ड्स ऑस्ट्रेलियातील रस्त्यावरून कारने वेगाने जात होता. त्याचवेळी अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला होता.
फ्लिन्टॉपची ११ वर्षांची कारकीर्द
फ्लिन्टॉप ११ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. यात तो ७९ कसोटी, १४१ वनडे आणि ७ टी २० सामने खेळला. या अष्टपैलू खेळाडूनं कसोटी क्रिकेटमध्ये ५ शतकांसह ३८४५ धावा केल्या. तर २२६ विकेट्सही घेतल्या आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ३३९४ धावा असून, त्यात त्यानं ३ शतके ठोकली आहेत. तर १६९ विकेट्स घेतल्या आहेत. टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ७६ धावा केल्या. तर ५ विकेट्स घेतल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.