Pvr Prasanth google
Sports

Asia Cup 2025: आमदाराच्या जावयाला आशिया कपसाठी मिळाली संधी, BCCI ने दिली महत्वाची जबाबदारी

MLA Son In Law PVR Prasanth Selected For Asia Cup For Team India:आशिया कप २०२५ साठी भारतीय संघ लवकरच UAE साठी रवाना होणार आहे. याआधी भारतीय संघासोबत नवीन सदस्याला सामील करण्यात आले आहे. आमदाराच्या जावयाला बीसीसीआयने संधी दिली आहे. पण का? जाणून घेऊयात...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अवघ्या काही दिवसातच आशिया कप स्पर्धेची सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान दुबई आणि अबू धाबी येथे होणार आहे. या स्पर्धेमध्ये आशिया खंडातील ८ संघ भिडणार आहेत. यासाठी भारतीय संघ सज्ज असून ४ सप्टेंबर रोजी यूएईला रवाना होईल. त्याआधी बीसीसीआयने भारतीय संघात एका नवीन चेहऱ्याला सामील केले आहे. स्पर्धेपूर्वी, बीसीसीआयने टीम इंडियाचे व्यवस्थापक म्हणून पीव्हीआर प्रशांत यांना नियुक्त केले आहे. जे आशिया कपमध्ये भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका बजावताना दिसतील. आंध्र प्रदेशातील प्रशांत यांचा क्रिकेट आणि राजकारणाशी संबध आहे. त्यांनी यापूर्वी आंध्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून देखी काम केले आहे.

कोण आहेत टीम इंडियाचे नवीन मॅनेजर?

टीम इंडियाचे नवीन मॅनेजर म्हणून नियुक्त झालेल्या पीव्हीआर प्रशांत यांचे राजकीय संबंधही मजबूत आहेत. त्यांचे वडील, पुलपार्थी रमणजनेयुलु हे आमदार आहेत. ज्यांना अंजी बाबू म्हणूनही ओळखले जाते.२०२४ मध्ये ते पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षात सामील झाले. त्यांचे सासरे, गंता श्रीनिवास राव, भीमिली येथील टीडीपीचे विद्यमान आमदार आणि आंध्र प्रदेश सरकारमधील माजी मंत्री आहेत.

पीव्हीआर प्रशांत यांचा क्रिकेटधील अनुभव

आंध्र प्रदेशातील भीमावरम येथील रहिवासी असलेले प्रशांत यांनी टीम इंडियाचे मॅनेजर होण्याआधी आंध्र प्रदेश क्रिकेटमध्ये महत्वाच्या पदावर काम केले आहे. त्यांनी यापूर्वी आंध्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी ओल्ड वेस्ट गोदावरी संघाकडून जिल्हा पातळीवर क्रिकेट देखील खेळले आहे. हा अुनभव पाहता,भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्यांना आशिया कपमध्ये मोठी जबाबदारी सोपवली आहे.

टीम इंडियाच्या मॅनेजरचे काम

टीम इंडियाचे मॅनेजर म्हणून प्रशांत आशिया कपमध्ये महत्वाची भूमिका बजावतील. प्रशांत संघाशी संबंधित सर्व लॉजिस्टिक्स, प्रवास आणि मैदानाबाहेरील बाबी हाताळण्याची जबाबदारी घेतील. तसेच, बीसीसीआय आणि भारतीय संघातील मुख्य संपर्क म्हणूनही काम करतील, जेणेकरून स्पर्धेदरम्यान खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. टीम इंडिया ४ सप्टेंबर रोजी यूएईला रवाना होणार आहे आणि त्यांचा पहिला सामना यूएईविरुद्ध असेल, त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी पाकिस्तानशी हाय-प्रोफाइल सामना होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PAK vs BAN: बांगलादेश आऊट; फायनलमध्ये रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

Unrest in Ladakh: लेह-लडाखमध्ये दहशत; भाजप कार्यालय जाळले, Gen-Z आंदोलन का उफाळलं?

MHADA Diwali Bonus: म्हाडा कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर! खात्यात किती जमा होणार पैसा?

EPFO सदस्यांसाठी खूशखबर, आता ATMमधून काढा पीफचे पैसे

Maharashtra Politics: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे अॅक्टिव्ह नवरात्रीचं कारण की निवडणुकीची रणनीती?

SCROLL FOR NEXT