Akash Deep Ind Vs Eng  x
Sports

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Akash Deep Ind Vs Eng : एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात आकाश दीपने पाच विकेट्स घेतल्या आहेत. या कामगिरीमुळे आकाश दीपचे कौतुक होत आहे. दोन्ही डावात त्याने शानदार कामगिरी केली आहे.

Yash Shirke

Ind Vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये आकाश दीपने पाच विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्यामध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी आकाश दीपला खेळवण्यात आले. मिळालेल्या संधीचे सोनं करत आकाश दीपने त्याचा क्लास दाखवला. पाचव्या विकेटनंतर त्याच्या डोळ्यात पाणी आले. त्याने पहिल्या डावातही चार गडी बाद केले होते.

आकाश दीपच्या जाळ्यात अडकला जॅमी स्मिथ

जॅमी स्मिथच्या रुपात आकाश दीपने दुसऱ्या डावात पाचवी विकेट घेतली. ५५ व्या ओव्हरमध्ये जॅमी स्मिथ आणि ब्रेडन कार्स खेळत होते. ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर ब्रेडन कार्सने ३ धावा काढत स्ट्राईक जॅमी स्मिथकडे दिली. पुढच्या दोन चेंडूवर स्मिथने दोन दमदार षटकार मारले. पण चौथ्या चेंडूवर तो बाद झाला. त्याच्या रुपाने आकाश दीपने पाचवी विकेट मिळवली.

आकाश दीपने पहिल्या डावात चार विकेट्स घेतल्या होत्या. पहिल्या डावात मोहम्मद सिराजने सहा गडी बाद केले होते. दोघांच्या योगदानामुळे इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर ऑलआउट झाला होता. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही आकाश दीपने शानदार कामगिरी केली. त्याने पाच विकेट घेत भारताच्या विजयासाठी बहुमूल्य योगदान दिले.

भारत विरुद्ध इंग्लंड एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात चौथ्या दिवशी आकाश दीपने बेन डकेट आणि जो रुट यांना बाद केले. सामन्याच्या पाचव्या दिवशी त्याने ऑली पोप, हॅरी ब्रूक आणि जॅमी स्मिथ यांची विकेट घेतली. जसप्रीत बुमराहच्या जागी आकाश दीपला संघात संधी देण्यात आली होती. या संधीचे आकाश दीपने सोनं केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शहाजी बापू पाटील यांच्यातील वाद संपुष्टात

Municipal Election : पुढच्या आठवड्यात आचारसंहिता लागणार? वाचा महापालिका निवडणुकीचे अपडेट

MSRTC Tours: लाल परी, लय भारी; पॅकेज टूरने एसटी झाली मालामाल, किती कमावले?

Maharashtra Winter Assembly: विधीमंडळातील आसन व्यवस्थेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद

Ladki Bahin Yojana: अपात्र असतानाही ₹१५०० घेतले, कारवाई होणार का? आदिती तटकरेंनी एका वाक्यात विषय संपवला

SCROLL FOR NEXT