ind vs ban twitter
Sports

IND vs BAN 1st Test: W,W...आकाश 'दीप' पेटला! लागोपाठ 2 चेंडूंवर उडवल्या त्रिफळा; पाहा VIDEO

Akash Deep Bowling: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीत आकाश दीपच्या शानदार गोलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला आहे.

Ankush Dhavre

Akash Deep Bowling, IND vs BAN: आकाश दीप हा भारतीय संघासाठी स्टार गोलंदाज म्हणून उदयास आला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर त्याला इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. पदार्पणाच्या सामन्यात त्याने ३ गडी बाद केले होते. त्यानंतर दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात ९ गडी बाद करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतही त्याच्या गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला आहे.

भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ३७६ धावा केल्या आहेत. बांगलादेशचा युवा वेगवान गोलंदाज हसन महमूदने सुरुवातीच्या १ तासात भारतीय संघाला ३ मोठे धक्के दिले होते. या युवा गोलंदाजाने विराट कोहली, रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना बाद करत माघारी धाडलं होतं. आता भारतीय गोलंदाजांनी अफगाणिस्तानवर पलटवार केल्याचे पाहायला मिळाले आहे. या सामन्यातील सुरवातीच्या षटकांमध्येच भारतीच गोलंदाजांनी बांगलादेशचा टॉप ऑर्डर फोडून काढला आहे.

या सामन्यातील ९ वे षटक टाकण्यासाठी आकाश दीप गोलंदाजीला आला. हे त्याचं वैयक्तिक दुसरं षटक होतं. डाव्या हाताच्या फलंदाजाला आकाश दीप राऊंड द विकेटने मारा करत होता. त्याचा पहिलाच चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर पडला आणि टप्पा पडताच वळला आणि आत आला. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर त्याने दुसऱ्याच चेंडूवर मोमिमूलची दांडी गुल केली. यासह त्याने लागोपाठ दोन चेंडूंवर २ फलंदाजांना बाद केलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

भारतीय संघाने केल्या ३७६ धावा

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. या सामन्यात भारतीय संघाकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने ५६ धावांची खेळी केली. आर अश्विनने सर्वाधिक १०८ आणि रविंद्र जडेजाने ८६ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rangoli Tips: दारासमोर काढलेली रांगोळी फेकून देऊ नका, असा करा वापर, भांडी होतील झटक्यात चकाचक

Maharashtra Live News Update : निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोर्चा काढणार - बाळा नांदगावकर

Viral Resignation Letter : "टार्गेट वाढतं, पण पगार नाही..." कंपनीला वैतागून घेतला तडकाफडकी निर्णय, सोशल मीडियावर राजीनामा व्हायरल

३० हजार पगार, २० हजार भाडं; मोठी शहरं.. मध्यमवर्गीयांनी जगावं तरी कसं? विश्लेषकाची पोस्ट व्हायरल

Sangram Jagtap: हिंदूंच्या दुकानात 'लादेन आणि सद्दाम'चे फटाके कसे? अजित पवारांच्या आमदाराचा सवाल|VIDEO

SCROLL FOR NEXT