Fact Check: 'द रॉक'ला टीबीची लागण? टीबीमुळे हट्टाकट्टा रॉक झाला हाडकुळा?

The Rock Health Rumours: आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो... द रॉक तुम्हाला माहितीच असेल...एकेकाळी WWE गाजवलेल्या रॉकला टीबीची लागण झाल्याचा दावा करण्यात आलाय...हट्टाकट्टा असलेला रॉक आता हाडकुळा झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय...पण, खरंच रॉकची अशी अवस्था झालीय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात...
THE ROCK TB VIRAL VIDEO FACT CHECK
THE ROCK TB VIRAL VIDEO FACT CHECKsaam tv
Published On: 

...हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल...हा आहे द रॉक...एकेकाळी WWE या मनोरंजन व्यावसायिक कुस्तीत बलाढ्य नाव असलेल्या रॉकला टीबीची लागण झाल्याचा दावा करण्यात आलाय...त्याचा हा व्हि़डिओ पाहून अनेकांना विश्वासही बसणार नाही...हट्टागट्टा असलेला रॉक खरंच टीबीने त्रस्त झालाय का...? टीबीमुळे त्याची शरीरयष्टी कमकुवत झालीय का...?

...द रॉकचे भारतात लाखो फॅन्स आहेत...रॉकसाठीच WWE अनेकजण पाहायचे...त्यामुळे त्यामुळे आम्ही याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली...खरंच रॉकला टीबीची लागण झालीय का...? रॉक हा 2004 पर्यंत WWE गाजवली...त्यानंतर तो सिनेमात काम करू लागला...त्याच्या स्टाईलमुळे तो सर्वाधिक फी आकारणारा अभिनेता ओळखला गेला...हॉलिवूड चित्रपटातील अॅक्टिंगमुळे त्याचे आणखी चाहते वाढले...सध्या तो चित्रपटात काम करतोय...पण, खरंच त्याला टीबी झालीय का...? टीबीमुळे त्याची तब्येत बिघडलीय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्याचे सोशल मीडिया हॅन्डल पाहिले, इन्स्टाग्राम पाहिलं...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

द रॉकला टीबीची लागण झालेली नाही

रॉकचे व्हिडिओ एआय निर्मित बनवलेयत

रॉकने सध्या चित्रपटासाठी 22 किलो वजन कमी केलंय

रॉक आधीसारखाच तंदुरुस्त आहे

सध्या एआयचा जमाना असल्याने कुणीही असे व्हिडिओ तयार करून व्हायरल करतोय...पण, रॉकला कोणताही आजार झालेला नाही...त्याने आगामी चित्रपटासाठी वजन कमी केलंय...आपल्या नवीन भूमिकेत फिट होण्यासाठी त्याने गेल्या वर्षभरात अंदाजे सुमारे २२ किलो वजन कमी केलंय...चाहत्यांनी काळजी करण्याची गरज नाही. ड्वेन जॉन्सन म्हणजेच रॉक पूर्णपणे निरोगी आहे...तो पूर्वीपेक्षा अधिक तंदुरुस्त आणि उत्तम आहे...त्यामुळे आमच्या पडताळणीत रॉकला टीबीची लागण झाल्याचा दावा असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.