ajinkya rahane shreyas iyer twitter
क्रीडा

Irani Cup 2024: अजिंक्य रहाणे बनला मुंबईचा कर्णधार! श्रेयस अय्यरलाही मिळाली संधी

Ankush Dhavre

भारतात दुलीप ट्रॉफी २०२४ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतीय संघातील स्टार खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत मयांक अगरवालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय अ संघाने बाजी मारली. या स्पर्धेनंतर आता इराणी कप स्पर्धा सुरू होणार आहे.

या स्पर्धेत मुंबईचा संघ आणि रेस्ट ऑफ इंडिया संघ आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेत अजिंक्य रहाणे मुंबईचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर श्रेयस अय्यरकडे देखील कमबॅक करण्याची संधी असणार आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, अजिंक्य रहाणे मुंबई संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. यासह श्रेयस अय्यर देखील ही स्पर्धा खेळताना दिसून येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर असलेला शार्दुल ठाकूर देखील या स्पर्धेतून कमबॅक करताना दिसेल.

रहाणे भारतीय संघात कमबॅक करणार?

रोहित-विराटच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेला भारतीय संघात स्थान मिळणंही कठीण झालं आहे. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन पराभूत केलं. मात्र वेस्टइंडीज दौऱ्यानंतर त्याला भारतीय संघात संधी मिळालेली नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलमध्ये तो भारताकडून खेळताना दिसून आला होता. या सामन्यात त्याने दमदार खेळ केला होता. या स्पर्धेत चांगली कामगिरी करून तो भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी दावा करू शकतो.

श्रेयस अय्यर करणार कमबॅक?

श्रेयस अय्यर देखील भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करतोय. त्याला दुलीप ट्रॉफीत संधी मिळाली होती. मात्र या स्पर्धेत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. गेले काही महिने संघाबाहेर राहिल्यानंतर त्याला श्रीलंका दौऱ्यावर कमबॅक करण्याची संधी मिळाली होती. मात्र या मालिकेतही तो पूर्णपणे फ्लॉप ठरला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT