ajinkya rahane Saam tv news
Sports

Team India: टीम इंडियासाठी ८५ कसोटी सामने खेळणारा हा फलंदाज लवकरच निवृत्ती घेणार? संघात कमबॅक करणं कठीण

Ajinkya Rahane: भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अंजिक्य रहाणेला भारतीय संघासाठी १०० कसोटी सामने खेळायचे आहेत. मात्र त्याचं हे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग आणखी खडतर होताना दिसून येत आहे.

Ankush Dhavre

Ajinkya Rahane Comeback In Team India:

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज अंजिक्य रहाणेला भारतीय संघासाठी १०० कसोटी सामने खेळायचे आहेत. मात्र त्याचं हे स्वप्न पूर्ण होण्याचा मार्ग आणखी खडतर होताना दिसून येत आहे. कारण सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये तो शू्न्यावर बाद होऊन माघारी परतला आहे. आधी आंध्रप्रदेशविरुद्ध आणि आता केरळ संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे.

अंजिक्य रहाणेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं होतं. या सामन्यात उपकर्णधारपदही दिलं गेलं होतं. २०२२ मध्ये अंजिक्य रहाणे पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्यामुळे त्याला आपलं संघातील स्थान गमवावं लागलं होतं. मात्र श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला. भारतीय संघाला मध्यक्रमात अनुभवी फलंदाजाची गरज होती. त्यावेळी अंजिक्य रहाणेला कमबॅक करण्याची संधी दिली गेली होती.

रणजी ट्रॉफी स्पर्धा हा अंजिक्य रहाणेसाठी भारतीय संघात कमबॅक करण्याचा एकमेव मार्ग होता. मात्र हा मार्गही बंद होताना दिसून येत आहेत. कारण या स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला आहे. (Latest sports updates)

संघात कमबॅक करणं कठीण..

सध्या भारतीय संघात मध्यक्रमात फलंदाजी करण्यासाठी एकापेक्षा एक फलंदाज आहेत. श्रेयस अय्यरने गेल्या २ वर्षात ५ व्या नंबरवर फलंदाजी करताना १२ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि १ अर्धशतकी खेळीसह ७०७ धावा केल्या आहेत.

त्यामुळे श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणं निश्चित आहे. तर दुसरीकडे यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार खेळ करुन दाखवला आहे. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत यष्टीरक्षण करताना दिसून येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT