ajinkya rahane with cheteshwar pujara google
Sports

IND vs SA: टीम इंडियाच्या पराभवानंतर रहाणे-पुजाराने कसली कंबर! कसून सराव करत असल्याचा Video व्हायरल

Ajinkya Rahane- Cheteshwar Pujara : भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर संघाबाहेर असलेले अंजिक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारासारखे अनुभवी खेळाडू चर्चत आले आहेत.

Ankush Dhavre

Ajinkya Rahane- Cheteshwar Pujara Batting Practice:

भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दारुण पराभवाचा करावा लागला आहे. सेंच्युरियनच्या मैदानावर झालेल्या हा सामना भारतीय संघाने १ डाव आणि ३२ धावांनी गमावला आहे.

या सामन्यात केएल राहुल आणि विराट कोहलीला सोडलं तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आलेली नाही. या निराशाजनक कामगिरीनंतर संघाबाहेर असलेले अंजिक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारासारखे अनुभवी खेळाडू चर्चत आले आहेत.

अंजिक्य रहाणेचा रेकॉर्ड भारतापेक्षा परदेशात दमदार राहिला आहे. परदेशात उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर अंजिक्य रहाणेची बॅट चांगलीच तळपली असती असं सुनील गावसकरांनी म्हटलं आहे. जर अंजिक्य रहाणे संघात असता तर भारतीय संघाची ही अवस्था नसती, असं सुनील गावसकरांनी म्हटलं आहे. (Latest sports updates)

रहाणेचा व्हिडिओ व्हायरल..

अंजिक्य रहाणेला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. संघाबाहेर असतानाही तो कसून सराव करताना दिसून येत आहे. नुकताच त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओत तो फलंदाजीचा सराव करताना दिसून येत आहे. या व्हिडिओला 'विश्रांतीचा दिवस नाही..' असे कॅप्शन दिले आहे. या ४ सेकंदाच्या व्हिडिओत त्याच्या फलंदाजीतील क्लास टायमिंग पाहायला मिळत आहे.

पुजाराचा कसून सराव..

रहाणेसह चेतेश्वर पुजाराला देखील या संघात स्थान देण्यात आलेलं नाही. हे दोन्ही अनुभवी खेळाडू नसण्याचा भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघात अनुभवाची कमतरता दिसून आली.

दरम्यान संघाबाहेर असताना चेतेश्वर पुजारा रणजी ट्रॉफीसाठी कसून सराव करताना दिसून आला आहे. त्याचा फलंदाजीचा सराव करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी घेतली भेट; वाढदिवसानिमित्त शिवतीर्थावर दाखल

Karjat Tourism : डोंगर, दऱ्या अन् धबधबे; कर्जतजवळ प्लान करा दिवाळी वीकेंड, 'हे' आहे खास लोकेशन

Gold price : अवघ्या ६ मिनिटात सोनं ७,७०० रुपयांनी स्वस्त; सोन्याच्या दरात वर्षभरातील सर्वात मोठी घसरण

Thursday Horoscope: भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर ४ राशींचे नशीब बदलणार, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Mahanagarpalika Election: मुंबईत फक्त महायुती, इतर ठिकाणी स्वतंत्र; स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा असा प्लॅन का? काय आहे रणनीती?

SCROLL FOR NEXT