ajinkya pawar twitter
Sports

Pro Kabaddi Auctions: कोकणकर अजिंक्य झाला कोट्यधीश! या संघाने लावली मोठी बोली

Ajinkya Pawar, Pro kabaddi auction 2024: महाराष्ट्राचा सुपुत्र अजिंक्य पवारने प्रो कबड्डीच्या लिलावात चांगलाच भाव खाल्ला. या लिलावात त्याच्यावर मोठी बोली लागली आहे.

Ankush Dhavre

महाराष्ट्राचा सुपुत्र अजिंक्य पवारची प्रो कबड्डीच्या लिलावात लॉटरी लागली आहे. प्रो कबड्डीच्या ११ व्या हंगामासाठी लिलाव सुरू आहे. या लिलावातील पहिल्या दिवशी (१५ ऑगस्ट) बऱ्याच खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लागली. त्यापैकीच एक खेळाडू म्हणजे मराठमोळा अजिंक्य पवार. बेंगलुरू बुल्सने त्याला १.१०७ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं आहे.

लिलावात बी कॅटेगरीमध्ये असणाऱ्या अजिंक्य पवारची बेस प्राईज २० लाख रुपये इतकी होती. मात्र लेफ्ट रेडर असलेल्या अजिंक्यला आपल्या संघात घेण्यासाठी जयपूर पिंक पँथर्स, युपी योद्धा आणि बेंगलुरू बुल्स यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. शेवटी बेंगलुरू बुल्सने १.१०७ कोटी रुपये मोजत त्याला आपल्या संघात स्थान दिलं.

अजिंक्य पवारबद्दल बोलायचं झालं, तर त्याने जयपूर पिंक पँथर्स संघाकडून आपल्या प्रो कबड्डी कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर तो तमिळ थलाईवाज संघाकडून खेळू लागला. अतिशय चपळ आणि डाव्या बाजूने चढाई करणाऱ्या या खेळाडूची बेंगलुरू बुल्सला गरज होती. त्यामुळे त्यांनी डाव साधला आणि मोठी किंमत मोजत त्याला आपल्या ताफ्यात स्थान दिलं.

अजिंक्य पवार गेल्या ३ वर्षांपासून तमिळ थलाईवाज संघासाठी खेळतोय. या संघाकडून खेळताना १०० पेक्षा अधिक गुणांची केली आहे. आता त्याला बेंगलुरू बुल्सकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. जयपूर पिंक पँथर्सकडून खेळताना त्याने आपल्या प्रो कबड्डी कारकिर्दीची सुरुवात केली खरी मात्र त्याला ओळख मिळाली ती तमिळ थलाईवाज कडून खेळताना. या संघाला प्लेऑफमध्ये पोहचवण्यात त्याने अतिशय मोलाची भूमिका बजावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Turmeric Milk Benefits: थंडीत रोज हळदीचं दूध प्यायल्याने कोणते फायदे होतात?

Pune Tourism: इतिहास जपणारे किल्ले! हिवाळ्यात मुलांसोबत पुण्यातील या ५ किल्ल्यांवर नक्की फिरून या

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला धक्का; बड्या नेत्यानं हाती घेतलं धनुष्यबाण, सतेज पाटलांना शिंदेंचा धोबीपछाड

Crime News: औरंगाबादमध्ये हत्याकांड! तरुणाला पकडून हातपाय बांधले, नंतर टोळक्यांनी क्रूरपणे संपवलं, भलतंच कारण समोर आलं

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये पर्यावरण प्रेमींनी घेतली राज ठाकरे यांची भेट

SCROLL FOR NEXT