Aiden markram scored fastest ever century in odi world cup in just 49 balls south africa vs srilanka world cup 2023 Saam tv news
Sports

Aiden Markram Century: 'मार्करम' चा 'पराक्रम' श्रीलंकेविरुद्ध ठोकलं विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक

South Africa vs Srilanka: या सामन्यात एडेन मार्करमने तुफानी फटकेबाजी करत ऐतिहासिक शतक झळकावलं आहे.

Ankush Dhavre

Fastest Century In ODI World Cup History:

वर्ल्डकप स्पर्धेत शनिवारी डबल हेडर सामन्यांचा थरार पार पडला. पहिला सामना बांगलादेश आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या ३ फलंदाजांनी शतके ठोकली. दरम्यान एडेन मार्करमने ४९ चेंडूंचा सामना करत वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले आहे.

एडेन मार्करमचं ऐतिहासिक शतक..

या सामन्यात एडेन मार्करम चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने फलंदाजीला येताच श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घ्यायला सुरुवात केली. या डावात त्याने ४९ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं.

या खेळीदरम्यान त्याने १४ चौकार आणि ३ गगनचुंबी षटकार मारले. या खेळीसह त्याने केविन ओ'ब्रायनचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. केविन ओ'ब्रायनने २०११ वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडविरूद्ध झालेल्या सामन्यात ५० चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केलं होतं. (Latest sports updates)

३ फलंदाजांनी ठोकलं शतक..

या सामन्यात क्विंटन डी कॉकने ८४ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने १०० धावांची खेळी केली. तर रासी वॅन डर डुसेनने ११० चेंडूंचा सामना करत १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १०८ धावा ठोकल्या.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सर्वात जलद शतक झळकावणारे फलंदाज...

४९ चेंडू - एडेन मार्करस विरूद्ध (२०२३)*

५० चेंडू - केविन ओ'ब्रायन विरुद्ध इंग्लंड (२०११)

५१ चेंडू - ग्लेन मॅक्सवेल विरुद्ध श्रीलंका (२०१५)

५२ चेंडू - एबी डिव्हिलियर्स विरुद्ध वेस्टइंडिज(२०१५)

५७ चेंडू - ओयन मॉर्गन विरुद्ध अफगाणिस्तान (२०१९)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT