चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी सुरुच आहे. आज या स्पर्धेचा १४ वा दिवस असून आतापर्यंत भारताने स्पर्धेत १०० पदकांची कमाई केली आहे. यामध्ये २५ सुवर्णपदकाचा समावेश आहे. भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीने १४० कोटी भारतीयांची मान उंचावली आहे. (Latest Marathi News)
आशियाई क्रीडा स्पर्धेचा १४ वा दिवस भारतासाठी चांगला होता. शुक्रवारी भारताने (India) एकूण ९ पदकांची कमाई केली. महिला कबड्डीपटूंनी भारताला शंभरावं मेडल मिळवून दिलं. तैवानवर २६-२४ अशा फरकाने विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं.
कबड्डीमधील विजयात पुण्याच्या स्नेहल शिंदेची कामगिरी मोलाची ठरली. हाफ टाईमपर्यंत भारतीय टीम १४-०९ अशी आघाडीवर होती. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये तैवानने जोरदार मुसंडी मारली. अटीतटीच्या या सामन्यात (Sport News) भारताने विजय मिळवला.
दरम्यान, भारतीय हॉकी संघाने देखील सुवर्णपदक पटकावलं आहे. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने १०० पदकांचा टप्पा गाठला आहे. यामध्ये २५ गोल्ड, ३५ सिल्व्हर आणि ४० ब्राँझ मेडल्सचा समावेश आहे. महत्वाची बाब म्हणजे भारताने आतापर्यंत ९ खेळांमध्ये कमीत कमी एक गोल्ड मेडल जिंकलं आहे.
यामधील सर्वाधिक ७ गोल्ड मेडल्स यातील शूटिंगमध्ये मिळाले आहेत. तर, अॅथलेटिक्समध्ये ६ गोल्ड मेडल्स मिळाले आहेत. याशिवाय नेमबाजीत ५ तर स्क्वाशमध्ये २ गोल्ड मेडल मिळाले आहेत. यासोबतच टेनिस, हॉकी, कबड्डी, घोडेस्वारी आणि क्रिकेटमध्ये आतापर्यंत १-१ गोल्ड मिळाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.