aiden markram
aiden markram  twitter
क्रीडा | IPL

Aiden Markram On SRH Loss: जिंकलेला सामना गमावल्यानंतर SRH चा कर्णधार भडकला! आपल्याच संघावर केला मोठा आरोप

Ankush Dhavre

SRH VS KKR IPL 2023: मात्र संघातील फलंदाजांनी स्वतः हा विजय कोलकाता नाईट रायडर्स संघाला भेट म्हणून दिला. दरम्यान या पराभवानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करमने पराभवाचं कारण सांगितलं आहे.

सामन्यानंतर काय म्हणाला

हातचा सामना निसटल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करम म्हणाला की, "आम्ही या सामन्यात चांगला खेळ केला. मात्र जेव्हा हा पराभव पचवणं कठीण आहे. क्लासेनने अप्रतिम फलंदाजी केली आणि माझ्यावरचा दबाव कमी केला. आम्ही ती भागीदारी पुढे न्यायला पाहिजे होते. आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. फलंदाजांनी देखील भागीदारी केली. मात्र ती पुरेशी ठरली नाही. आक्रमक खेळ करण्याच्या प्रयत्नात आमच्या फलंदाजांनी खूप चुका केल्या."

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना आक्रमक फलंदाज रिंकू सिंगने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. तर कर्णधार नितीश राणाने ४२ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. कोलकाताने या डावात ९ गडी बाद १७१ धावा केल्या होत्या. (Latest sports updates)

सनरायझर्स हैदराबाद संघाला हा सामना जिंकण्यासाठी १७२ धावांची गरज होती. आव्हान कमी होतं. मात्र कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. कठीण परिस्थितीतही त्यांनी आपल्या संघाला सामना जिंकून दिला. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून कर्णधार एडन मार्करमने सर्वाधिक ४१ तर हेन्री क्लासेनने ३६ धावांची खेळी केली. हे दोघे जेव्हा खेळत होते. त्यावेळी असे वाटत होते की, हैदराबाद संघ या सामन्यात एकहाती विजय मिळवणार मात्र कोलकाताच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत आपल्या संघाला ५ धावांनी विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Patna News: शाळेजवळच्या नाल्यात सापडला ७ वर्षीय मुलाचा मृतदेह; आक्रमक पालकांनी लावली शाळेला आग

Today's Marathi News Live : पुणे छत्रपती मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनवर गुन्हा

Rasta Roko Andolan: पाण्यासाठी शेतकऱ्यांनी राेखला नगर मनमाड महामार्ग, रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा

Water Tree : आंध्रप्रदेशमधलं निसर्गाचं अद्भुत सौंदर्य; चक्क झाडांच्या खोडातून मिळतं पिण्याचं पाणी

Uddhav Thackeray On Narendra Modi | गाईपेक्षा महागाईवर बोला, ठाकरे बरसले

SCROLL FOR NEXT