mohammed shami with rohit sharma yandex
Sports

Mohammed Shami: 'तो आधी समजावून सांगतो, मग नंतर...' रोहित शर्माबाबत मोहम्मद शमीचा मोठा खुलासा

Mohammed Shami On Rohit Sharma: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने रोहित शर्माबाबत मोठा खुलासा केला आहे.

Ankush Dhavre

मुंबईत क्रिकेट रेटिंग अवॉर्ड शो पार पडला. या सोहळ्याला अनेक दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती. या सोहळ्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तर विराट कोहलीला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला. यासह भारतीय संघातील अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला वनडे बॉलर ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान मोहम्मद शमी कर्णधार रोहित शर्माचं कौतुक करताना दिसून आला आहे.

मोहम्मद शमीला एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा या तिन्ही कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा अनुभव आहे. या अवॉर्ड शो दरम्यान शमीने रोहित शर्माचं कौतुक केलं आहे.

शमी म्हणाला की, 'रोहितबाबत सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे तो गोलंदाजांना स्वातंत्र्य देतो. मात्र जर त्याच्या कसोटीवर खरे उतरले नाही, तर मग त्याचं अॅक्शन बाहेर येऊ लागतं. त्यावेळी तो आपण काय केलं पाहिजे याबाबत मार्गदर्शन करतो. पण त्यानंतरही प्रदर्शनात सुधारणा होत नसेल, तर मग त्याचं रिअॅक्शन तुम्हाला टीव्हीवर दिसतं. '

रोहितच्या नेतृत्वाखाली जिंकली वर्ल्डकप ट्रॉफी

भारतीय संघाने २०१३ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर ११ वर्ष उलटूनही भारतीय संघाला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नव्हती. २०२३ मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने फायनलमध्य प्रवेश केला होता.

मात्र फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने दमदार खेळ करत एकही सामना न गमावता आयसीसीची ट्रॉफी उंचावली. यासह भारतीय संघाने ११ वर्षांनंतर आयसीसीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं.

मोहम्मद शमी ठरला सर्वोत्तम गोलंदाज

आयसीसी वनडे वर्ल्डकपसाठी मोहम्मद शमीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र त्याला सुरुवातीला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. दरम्यान हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाल्यानंतर शमीला संघात खेळण्याची संधी मिळाली. संधी मिळताच त्याने संधीचं सोनं केलं आणि या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करण्याचा मान पटकावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

SCROLL FOR NEXT