India vs England saam tv
Sports

India vs England: आयरलँडनंतर आता इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाची अग्निपरीक्षा, पाहा कसं आहे शेड्यूल?

India cricket team: आयरलँडविरुद्ध पराभवानंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर वनडे सामनेही होतील. 1 जुलै 2026 पासून सुरू होणाऱ्या या सिरीजमध्ये भारतासाठी कमबॅकची मोठी संधी आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आयरलँडविरुद्ध झालेल्या दोन सामन्यांच्या टी20 सिरीजमध्ये भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 सिरीज खेळवली जाणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची वनडे सिरीजही होणार आहे.

आयरलँडविरुद्धच्या पराभवामुळे टीम इंडियावर थोडा दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे आता इंग्लंडविरुद्ध ही सिरीज भारतासाठी “रिबाउंड” करण्याची मोठी संधी मानली जात आहे. या सिरीजमध्ये कर्णधार श्रेयस अय्यर यांच्यासाठीही ही महत्त्वाची परीक्षा असणार आहे. कारण आयर्लंड दौऱ्यात त्यांची फलंदाजीही अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती.

ही सिरीज 1 जुलै 2026 पासून सुरू होणार आहे. काही सामने उशिरा रात्री होणार असल्यामुळे भारतीय चाहत्यांच्या झोपेच्या वेळेतही बदल होऊ शकतो.

भारत–इंग्लंड सध्याची स्थिती

टीम इंडिया सध्या व्हाईट बॉल सिरीजसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही टीम्समध्ये पाच टी20 आणि तीन वनडे सामने होणार आहेत. आयर्लंडविरुद्ध भारताची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नव्हती आणि त्यामुळे संघावर टीका झाली होती. दुसरीकडे इंग्लंड टीमलाही या काळात चांगली कामगिरी करता आलेली नाही. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर त्यांना टेस्ट सिरीजमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे दोन्ही टीम्स या सिरीजमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीत असणार आहेत.

भारताचा टी20 टीम

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवि विश्नोई, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव.

इंग्लंडचा टी20 टीम

हॅरी ब्रूक (कर्णधार), विल जॅक्स, जेकब बेथेल, जेम्स कोल्स, फिल सॉल्ट (विकेटकीपर), जोस बटलर (विकेटकीपर), जॉर्डन कॉक्स, टॉम बँटन, सॅम करन, लियाम डॉसन, रेहान अहमद, ल्यूक वुड, आदिल रशीद, सन्नी बेकर, जोश टंग, साकिब महमूद, जोफ्रा आर्चर.

इंडिया विरुद्ध इंग्लंड टी20 सिरीज

  • पहिला टी20 सामना- 1 जुलै 2026, रिवरसाइड ग्राउंड, चेस्टर-ले-स्ट्रीट, रात्री 10:00 वाजता

  • दुसरा टी20 सामना- 4 जुलै 2026, ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर, संध्याकाळी 7:00 वाजता

  • तिसरा टी20 सामना- 7 जुलै 2026, ट्रेंट ब्रिज, नॉटिंघम, रात्री 10:00 वाजता

  • चौथा टी20 सामना- 9 जुलै 2026, काउंटी ग्राउंड, ब्रिस्टल, रात्री 10:00 वाजता

  • पाचवा टी20 सामना- 11 जुलै 2026, द रोज बाउल, साउथहॅम्प्टन, संध्याकाळी 7:00 वाजता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pension Rules : दुसऱ्या पत्नीलाही पेन्शन मिळणार? उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय समोर

8th Pay Commission : लेवल-10 कर्मचाऱ्यांची लॉटरी! तब्बल ₹५७,०००+ HRA मिळणार? पाहा संपूर्ण हिशोब

आनंदाची बातमी! LPG सिलेंडर झालं स्वस्त; कुठे आणि किती रुपयांना मिळतंय गॅस सिलेंडर?

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे खोळंबली, कळव्याजवळ तांत्रिक बिघाड

विचार करा, ममता दीदीचं काय झालं? निवडणुकीआधी सपा अन् काँग्रेस भिडले

SCROLL FOR NEXT