भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ धरमशाळेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आमने सामने आले होते. हा सामना जिंकून भारतीय संघाने वर्ल्डकप स्पर्धेत तब्बल २० वर्षांनंतर न्यूझीलंडवर विजय मिळवला आहे.
हा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सलग पाचवा विजय ठरला आहे. या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या २७४ धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने ९५ धावांची खेळी केली. या खेळीनंतर सोशल मीडियावर Selfish Kohli हा हॅशटॅग ट्रेन्ड होऊ लागला आहे.
सामच्या बातम्या Whatsapp वर मिळवण्यासाठी आत्ताच या लिंकवर क्लिक करा
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २७४ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना ३३ व्या षटकात भारतीय संघाला मोठा धक्का बसला. फॉर्ममध्ये असलेला फलंदाज केएल राहुल पायचित होऊन माघारी परतला. त्यानंतर सूर्यकुमार यादव आपला वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना खेळण्यासाठी मैदानावर आला.
न्यूझींलडकडून ३४ वे षटक टाकण्यासाठी ट्रेंट बोल्ट गोलंदाजीला आला होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने कव्हर्सच्या दिशेने शॉट मारला. सूर्याने धाव घेण्याचा इशारा केला,मात्र कोहलीचं लक्ष सूर्याकडे नसून चेंडूकडे होतं.
त्यामुळे त्याने उशिरा धावायला सुरूवात केली. इथेच गडबड झाली आणि सूर्यकुमार यादवला धावबाद होऊन माघारी परतावं लागलं. सूर्युकुमार यादव बाद झाल्यानंतर नेटकऱ्यांनी विराटवर जोरदार टीका केली आहे.
विराटचा धाव घेण्यास नकार..
हा सामना जिंकून देण्यात विराटने मोलाचं योगदान दिलं. त्याने या डावात ९५ धावांची खेळी केली. भारताचा विजय आणि शतक जवळ असताना विराटने न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करायला सुरूवात केली.
विराटला जडेजाने चांगली साथ दिली. मात्र ४२ वं षटक सुरू असताना विराटने जडेजाला दुसरी धाव घेण्यास नकार दिला. त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर झाले असे की, सँटनरच्या गोलंदाजीवर जडेजाने फाइन लेगच्या दिशेने शॉट मारला.
या चेंडूवर २ धावा सहज काढता आल्या असत्या. मात्र विराट स्लो धावत गेला. त्यानंतर जडेजा अर्ध्या क्रिझपर्यंत आलेला असताना त्याने दुसरी धाव घेण्यास नकार दिला. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी विराटवर टीका करताना दिसून येत आहेत. अनेकांचं असं म्हणणं आहे की, विराट आपलं शतक पूर्ण करण्यासाठी खेळतोय. (Latest sports updates)
विराट खरंच सेलफिश आहे का?
विराट आपलं शतक पूर्ण करण्यासाठी खेळतो अशा चर्चा सुरू असताना केएल राहुलचं विधानही चर्चेतच आलं आहे. बांगलादेशविरूद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने एकहाती विजय मिळवला होता.
या सामन्यात केएल राहुलने विराटला आपलं शतक पूर्ण करण्यात मदत केली होती. या सामन्यानंतर केएल राहुल म्हणाला होता की, 'मी विराटला सांगितलं की आपण एकेरी धाव घेणं टाळायचं. त्यानंतर विराट म्हणाला की, आपण एकेरी धाव नाही घेतली तर लोकांना वाईट वाटेल. असं केल्यास लोकांना वाटेल की, वैयक्तिक विक्रमांसाठी खेळतोय. त्यानंतर मी त्याला म्हणालो की, आपण हा सामना सहत जिंकतोय तु तुझं शतक पूर्ण कर. मग शेवटी जाऊन त्याला हे पटलं.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.