Mujeeb Ur Rahman, Fazal Haq Farooqi and Naveen Ul Haq google
क्रीडा

IPL 2024: विराटला नडणाऱ्या नवीनसह आणखी २ खेळाडूंवर बोर्डाची मोठी कारवाई; IPL स्पर्धेतून बाहेर?

Afghanistan Cricket Board: हा लिलाव झाल्यानंतर आयपीएलच्या ३ फ्रँचायझींचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या ३ खेळांडूवर फ्रँचायझी क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे.

Ankush Dhavre

Mujeeb Ur Rahman, Fazal Haq Farooqi and Naveen Ul Haq:

काही दिवसांपूर्वीच दुबईत आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी लिलाव पार पडला. या लिलावात ३३३ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या खेळाडूंपैकी ७२ खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली. या लिलावात खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडण्याता आला. दरम्यान हा लिलाव झाल्यानंतर आयपीएलच्या ३ फ्रँचायझींचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या ३ खेळांडूवर फ्रँचायझी क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे.

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने आयपीएल २०२४ स्पर्धा तोंडावर असताना मोठा निर्णय घेतला आहे. या बोर्डाने आपल्या ३ खेळाडूंवर फ्रँचायझी क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली आहे. विराटला नडणारा नवीन उल हक, मुजीब उर रहमान आणि फजहलक फारुकी या ३ खेळाडूंवर बंदी घातली आहे.

आता बंदी घातल्यानंतर हे तिन्ही खेळाडू येणाऱ्या २ वर्षात फ्रँजायझी क्रिकेट खेळताना दिसून येणार नाही. खेळाडूंनी देशासाठी खेळणं टाळून पैशांसाठी खेळण्याचा निर्णय घेतल्याने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने ही कारवाई केली आहे. त्यांनी करारमुक्त मागणी करण्याची मागणी तर मान्य केली आहे. मात्र हे खेळाडू येणारे २ वर्ष कुठलीही लीग क्रिकेट स्पर्धा खेळताना दिसून येणार नाही. (Latest sports updates)

जगभरात अनेक टी-२० क्रिकेट लीग स्पर्धा सुरु असतात. या खेळाडूंना या स्पर्धा खेळता याव्यात म्हणून त्यांनी आम्हाला करारमुक्त करा अशी मागणी केली होती. या मागणीनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने ही कारवाई केली आहे.

कुठलाही खेळाडू देशाबाहेर लीग क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी जात असेल तर त्याला एनओसी मिळणं अतिशय गरजेचं आहे. त्याशिवाय खेळाडू परदेशातील लीगमध्ये सहभागी होऊ शकत नाही. या स्पर्धांमधून खेळाडूंची बक्कळ कमाई होते.

त्यामुळे हे खेळाडू देशासाठी न खेळता फ्रँजायझी क्रिकेट खेळण्यावर अधिक भर देत होते. आयपीएल २०२४ स्पर्धेत मुजीब उर रहमानला कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या संघात स्थान दिलं आहे. तर मुजीब आणि फजहलक फारुकी यांना हैदराबाद संघात स्थान देण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT