अफगाणिस्तानने आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा ४ गडी राखून विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभूत करून रौप्यपदक निश्चित केलं आहे. सुवर्णपदकासाठी उद्या अफगाणिस्तानचा भारताशी सामना होणार आहे. (Latest Marathi News)
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या क्रिकेटमध्ये दुसऱ्या सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. पाकिस्तानच्या संघाने १८ षटकात ११५ धावा कुटल्या. त्यामुळे अफगाणिस्तानला ११६ धावांचं आव्हान मिळालं.
पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अफगाणिस्तान संघाची सुरुवात खराब झाली. अफगाणिस्तान संघाचा ९ धावांवर पहिला गडी बाद केला. सेदिकुल्लाह अवघ्या पाच धावांवर बाद झाला. विकेटकीपर मोहम्मद शहजादने केवळ ९ धावा करून तंबूत परतला.
शाहिदुल्लाह कमल शून्य धावांवर बाद झाला. अफसर जजईने २१ चेंडूत १३ धावा केल्या. नूर अलीने संघासाठी ३९ धावा कुटल्या. सातत्याने फलंदाजांची पडझड होऊ लागल्याने अफगाणिस्तान संघाची बिकट परिस्थिती झाली. अशा परिस्थितीत कर्णधार गुलबदीन नईबने संघाचा डाव सांभाळला. गुलबदीनने १९ धावा करत संघाला विजय मिळवून देण्यास महत्वाची भूमिका निभावली.
तत्पूर्वी, सेमी फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. उमर यूसुफ आणि मिर्झा बैगने फक्त २१ धावांची भागीदारी रचली. मिर्झा तिसऱ्या षटकात बाद झाला. त्याने केवळ ४ धावा कुटल्या. विकेटकीपर रोहेल नजीर , हैदर अली, कर्णधार कासिम अकरम, आमिर जमाल स्वस्तात माघारी परतले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.