Asian Games 2023: प्रणॉयची ऐतिहासिक कामगिरी!४१ वर्षांनंतर भारताला बॅडमिंटनमध्ये पहिलच पदक; सेलिब्रेशनचा VIDEO व्हायरल

HS Prnnoy Secured Bronze Medal In Badminton: कांस्यपदक जिंकल्यानंतर हटके सेलिब्रेशन केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
HS Prnnoy Secured Bronze Medal In Badminton
HS Prnnoy Secured Bronze Medal In BadmintonTwitter
Published On

Asian Games 2023:

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे. गुरूवारी (५ ऑक्टोबर) भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने पुरूषांच्या बॅडमिंटन एकेरी स्पर्धेत कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.

यासह इतिहासाला गवसणी घातली आहे. प्रणॉयने कांस्यपदकासाठी झालेल्या सामन्यात मलेशियाच्या ली झी जियावर २१-१६,२१-२३,२२-२० ने विजय मिळवला आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत ४१ वर्षांनंतर भारताला पहिल्यांदाच पुरूषांच्या बॅडमिंटन एकेरी स्पर्धेत पदक मिळालं आहे. हे ऐतिहासिक पदक जिंकल्यानंतर प्रणॉय हटके सेलिब्रेशन करताना दिसून आला आहे.

HS Prnnoy Secured Bronze Medal In Badminton
Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी रचला इतिहास! १३ वर्षांनंतर रिकर्व्हमध्ये मिळालं पहिलंच पदक

हटके सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल..

शेवटचा गुण मिळवल्यानंतर प्रणॉयचा आनंद गगणात मावेनासा झाला. कांस्यपदक जिंकताच तो जर्सी काढून डान्स करताना दिसून आला आहे. त्याचं सेलिब्रेशन पाहून अनेकांना सौरव गांगुलींनी केलेल्या सेलिब्रेशनची आठवण झाली असेल. भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी देखील २००३ मध्ये इंग्लंडला पराभूत केल्यानंतर जर्सी काढून सेलिब्रेशन केलं होतं. (Latest sports updates)

दुखापतग्रस्त असूनही जिंकून दिलं पदक..

कांस्यपदकाचा सामना खेळण्यापूर्वी प्रणॉय दुखापतग्रस्त असल्याची माहिती समोर आली होती. असं असताना देखील पूर्ण सामन्यात तो टेप लाऊन खेळला. या अतितटीच्या लढतीत त्याने मलेशियाच्या बॅडमिंटनपटूवर विजय मिळवला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com