भारताविरुद्ध मालिकेसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा saam tv
Sports

Ind vs Afg : भारताविरुद्ध वनडे, कसोटीसाठी टीम अफगाणिस्तान जाहीर; हुकमी एक्का संघाबाहेर

Afghanistan squad announced for India series : भारताविरुद्ध आगामी वनडे मालिका आणि एकमेव कसोटी सामन्यासाठी अफगाणिस्ताननं संघाची घोषणा केली आहे. हश्मतुल्लाह शाहीदी याच्याकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. तर दिग्गज खेळाडूला संघाबाहेर बसवलं आहे.

Nandkumar Joshi

अफगाणिस्तानचा संघ जूनमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका आणि एकमेव कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येत आहे. या भारत दौऱ्यासाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे. वनडे मालिका आणि कसोटी सामन्यात हश्मतुल्लाह शाहिदी हा कर्णधार असेल. या महत्वाच्या दौऱ्याची सुरुवात कसोटी सामन्याने होणार आहे. ६ जूनपासून न्यू चंदीगडमध्ये मुल्लांपूर मैदानात कसोटी सामन्याला सुरुवात होईल.

अफगाणिस्तानचा दिग्गज खेळाडू राशिद खान भारताच्या विरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात खेळणार नाही. राशिद हा कसोटीऐवजी मर्यादित षटकांच्या सामन्यांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. त्यामुळेच या कसोटी सामन्यात बेंचवर बसण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. तर भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी तो उपलब्ध असणार आहे. राशिदच्या अनुपस्थितीत कसोटीत शराफुदीन अशरफ आणि कैस अहमद हा फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळणार आहे.

भारताविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी अफगाणिस्तान संघाने बदल केले आहेत. निवड समितीने अब्दुल मलिक, रहमानुल्लाह जदरान, शराफुद्दीन अशरफ यांना कसोटी संघात स्थान दिलं आहे. तर रहमत शाह आणि गुरबाज यांसारख्या खेळाडूंनाही संधी दिली आहे. इकरम अलिखिल तसेच अफसर जजई यांना विकेटकीपर म्हणून संघात स्थान दिले आहे. अफगाणिस्तान संघाने वेगवान गोलंदाजीची जबाबदारी नवख्या खेळाडूंवर सोपवली आहे. नांग्याल खारोताई, बिलाल सामी, जिया शरीफी आणि सलीम सफी यांचा संघात समावेश केला आहे.

भारताविरुद्ध अफगाणिस्तानचा वनडे संघ

हश्मतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहित जदरान, सेदिकुल्लाह अटल, दरविश रसुली, रहमत शाह, इकराम अलिखिल, मोहम्मद नबी, अजमतुल्लाह उमरजाई, राशिद खान, नांग्याल खारोताई, एएम गजनफर, जिया यू रहमान शरीफी, फरीद मलिक, बिलाल सामी

राखीव - कैस अहमद, सलीम सफी, बशीर अहमद.

भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी अफगाणिस्तानचा संघ -

हश्मतुल्लाह शाहिदी (कर्णधार), सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, रहमानुल्लाह गुरबाज, अब्दुल मलिक, जदरान, अफसर जजई, इकराम अलिखिल, शराफुदीन अशरफ, अजमतुल्लाह उमरजई, नांग्याल खारोताई, कैस अहमद, बिलाल सामी, जिया शरीफी, सलीम सफी

राखीव - बशीर अहमद, बहिर शाह, इस्मत आलम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PNG-CNG Price Hike: महागाईचा स्फोट! CNG तिसऱ्यांदा महागला, PNG प्रति किलो 51.50 रुपयांवर

नांदेडचे नगरसेवक हॉटेल पॉलिटिक्सचे लाभार्थी; विधानपरिषद निवडणुकीत लाडक्या नगरसेवकांची चंगळ, VIDEO

Smart Meter Maharashtra: महावितरणचा सुलतानी फर्मान! स्मार्ट मीटरसाठी 48 तासांचा अल्टिमेटम, ग्राहकांमध्ये संताप

धानोरकर-वडेट्टीवारांमध्ये पुन्हा संघर्ष; सत्ता गमावल्यानंतरही काँग्रेसमधील वाद मिटेना

नवी मुंबईत भाजपमधील वाद टोकाला; नाईक-म्हात्रे वाद मुख्यमंत्र्यांच्या दरबारात

SCROLL FOR NEXT