AFG vs BAN, Highlights: अफगाणिस्तानने रचला इतिहास! बांगलादेशला लोळवत पहिल्यांदाच सेमिफायनलमध्ये प्रवेश
afghanistan cricket team twitter
क्रीडा | T20 WC

AFG vs BAN, Highlights: अफगाणिस्तानने रचला इतिहास! बांगलादेशला लोळवत पहिल्यांदाच सेमिफायनलमध्ये प्रवेश

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामना बागंलादेश आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना जिंकून दोन्ही संघांना सेमिफायनमध्ये जाण्याची संधी होती. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ११५ धावा केल्या. या धावांचा बचाव करताना अफगाणिस्तानने ८ धावांनी विजय मिळवला आहे.

बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी ११६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना लिटन दास ढाल बनून संघासाठी शेवटपर्यंत उभा राहिला. बांगलादेशला सेमिफायनलमध्ये जाण्याची संधी होती. हे आव्हान बांगलादेशला १३ षटकात पूर्ण करायचं होतं. मात्र हे आव्हान बांगलादेशचा संघ पूर्ण करु शकला नाही. या धावांचा बचाव करताना अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी पूर्ण जोर लावला. शेवटी अफगाणिस्तान संघाने बाजी मारत सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

अफगाणिस्तानने केल्या ११५ धावा

या सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानला २० षटकअखेर ५ गडी बाद ११५ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाजने ५५ चेंडूंचा सामना करत ४३ धावांची खेळी केली. तर इब्राहीम जदरानने २९ चेंडूंचा सामना करत १८ धावांची खेळी केली. त्यानंतर ओमरजाई १२ चेंडूंचा सामना करत १० धावा करत माघारी परतला. शेवटी करीम जनतने नाबाद ७ आणि राशिद खानने १० चेंडूंचा सामना करत ३ चौकारांच्या मदतीने नाबाद १९ धावांची खेळी केली.

अफगाणिस्तानचा सेमिफायनलमध्ये प्रवेश

अफगाणिस्तानला सेमिफायनलमध्ये जाण्यासाठी केवळ हा सामना जिंकायचा होता. मात्र अफगाणिस्तानला या सामन्यात हव्या तितक्या धावा करता आल्या नव्हत्या. आव्हान छोटं होतं. मात्र अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी या धावांचा यशस्वी बचाव केला. यासह सेमिफायनलचं तिकीट पक्क केलं आहे. अफगाणिस्तानचा सेमिफायनलचा सामना २७ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalki 2898 AD ची ११ व्या दिवशी छप्परफाड कमाई, दुसऱ्या आठवड्यातच 'गदर २'चा मोडला रेकॉर्ड

Best Agricultural State Award: महाराष्ट्राला 'सर्वोत्कृष्ट कृषी राज्य' पुरस्कार; दिल्लीत होणार पुरस्काराचे वितरण

IND vs ZIM: दुसरा सामना जिंकूनही शुभमन गिलची डोकेदुखी वाढली! समोर आलं मोठं कारण

Sambhajinagar crime : ४ गर्लफ्रेंडचे हट्ट पुरविण्यासाठी चोरल्या २५ दुचाकी; हरसुल पोलिसांची कारवाई

Abhishek Sharma:शतकी खेळीनंतर अभिषेक शर्माने 'गुरू' युवराज सिंगला केला व्हिडिओ कॉल! काय चर्चा झाली? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT